ऑनलाईन लाईफ पार्टनर शोधतांना राहा 'एक्स्ट्रा' सावध, मॅट्रिमोनिअल साइट्सवर फसवणुकीच्या घटना वाढल्या

नवी दिल्ली: आजकाल सगळेच डिजीटल झाले असताना आता लग्नासाठीचे वर- वधू संशोधन देखील ऑनलाईन झाले आहे. गेल्या काही वर्षांत भारतात अनेक मॅट्रिमोनिअल साइट्स आल्या असून ऑनलाइन कनेक्शन्स वाढविण्याचा ट्रेंडही वाढला आहे. पण, याचा गैरफायदाही अनेक जण घेत असून अशा किंवा सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून ते युजर्सची फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जर तुम्हीही अशा प्रकारच्या ऑनलाईन लग्नाची योजना आखत असाल तर तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टी लक्षत ठेवल्या तर लग्नाच्या या ऑनलाईन ट्रेंडमध्ये तुमची फसवणूक होणार नाही. अशा वेबसाईटवरून गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करत आहेत. पहिला मार्ग म्हणजे फसवणूक करणारे वेबसाइट्सद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात. वाचा: बहुतेक प्रकरणांमध्ये, ते स्वत: परदेशात राहतात असल्याचे सांगतात. बोलणे सुरु झाल्यावर ते तुम्हाला भेटवस्तू पाठवतात. एक-दोन वेळा भेटवस्तू घरी आल्या की, तुमचाही विश्वास बसतो . मग एके दिवशी ते तुम्हाला भारतात येत असून सोबत तुमच्यासाठी मोठी भेट वस्तू आणणार असल्याचेही सांगतात. पण, घडते अगदी याउलट. अचानक विमानतळावर कस्टम विभागाने त्यांना पकडल्याचा फोन येतो आणि त्यांना सोडण्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे द्यावे लागतात. अनेकदा हे लोक वेबसाइट्सद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात. नंतर संभाषण वाढवतात. तुमचा विश्वास जिंकल्यानंतर, अचानक ते तुम्हाला काही कारण सांगून पैसे मागतात आणि तुमचे पैसे घेऊन ते पसार होतात. काही प्रकरणांमध्ये तर असेही दिसून आले आहे, हे फ्रॉड्स लग्न देखील उरकून घेतात. काही दिवसांनी तुमचे पैसे आणि दागिने घेऊन पळून जातात . अशा प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्या अधिक महिला असतात. अशा प्रकारची फसवणूक टाळायची असेल तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यात काही टिप्स मदत करतील. मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवर जर कोणाशी मैत्री असेल आणि त्याच्याशी चॅटिंग सुरू झाली असेल, तर चॅटिंगदरम्यान त्याला तुमची सर्व माहिती देऊ नका. विशेषतः वैयक्तिक आणि बँकिंग माहिती देणे टाळा. संभाषणात समोरच्या व्यक्तीने तुम्हाला अनावश्यक प्रश्न विचारले तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक संकेतस्थळांवर मिळणाऱ्या नात्यांमधून तुम्ही पहिल्यांदाच भेटणार असाल तर तुम्ही एकटे जाणे टाळावे. अशा वेळी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये न भेटता सार्वजनिक ठिकाणी भेटा. समोरच्या व्यक्तीने संभाषणादरम्यान काही पैसे मागितले तर लगेच नकार द्या. व्हिसा किंवा कस्टम्स सारख्या प्रकरणात अडकलो आहोत असे सांगून पैसे मागितले तर लगेच नकार द्या आणि पोलिसांना कळवा. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VUr8iPb

Comments

clue frame