६ जीबी रॅमसह येणारा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त ७,४९९ रुपये; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: टेक्नोने भारतीय बाजारात आपला नवीन आणि बजेट TECNO SPARK 8C ला लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा भारतातील सर्वात स्वस्त ६ जीबी रॅम आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा स्मार्टफोन आहे. च्या या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम मिळते. तर अपडेटद्वारे ३ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल. अशाप्रकारे एकूण ६ जीबी रॅमचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरचा देखील सपोर्ट मिळतो. TECNO SPARK 8C ची किंमत फक्त ७,४९९ रुपये आहे. या फोनला तुम्ही मॅग्नेट ब्लॅक, आयरिस पर्पल, डायमंड ग्रे आणि फिरोजा सियान रंगात खरेदी करू शकता. टेक्नोच्या या फोनची विक्री २४ फेब्रुवारी २०२२ पासून Amazon.in वर सुरू होईल. वाचा: TECNO SPARK 8C चे स्पेसिफिकेशन्स TECNO SPARK 8C स्मार्टफोन अँड्राइड ११ आधारित HiOS ७.६ वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस ४८० निट्स आहे. यामध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. मात्र, कंपनीने मॉडेलचा खुलासा केलेला नाही. हा फोन मेमरी फ्यूजर फीचरसह येतो. यामध्ये ६ जीबी रॅम (३ जीबी व्हर्च्यूअल रॅम) सोबतच ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी TECNO SPARK 8C स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल एआय ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेऱ्यात एआय ब्यूटी ३.०, पोर्ट्रेट मोड, वाइड सेल्फी, एचडीआर, फिल्टर्स सारखे अनेक मोड मिळतात. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. TECNO SPARK 8C ची बॅटरी TECNO SPARK 8C स्मार्टफोनमध्ये आयपीएक्स२ स्पलॅश रेसिस्टेंट, डीटीएस साउंड, सोप्ले २.०, हायपार्टी, अँटी-ऑइल स्मार्ट फिंगरप्रिंट, फेस अनलॉक, ड्यूल ४जी VoLTE सह ३-इन-१ सिम स्लॉट आहे. फोनला मॅग्नेट ब्लॅक, आयरिस पर्पल, डायमंग ग्रे आणि फिरोजा सियान रंगात खरेदी करू शकता. फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. याबाबत ८९ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम आणि ५३ तासांचा टॉक-टाइमचा दावा केला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qs8tCJN

Comments

clue frame