स्वस्तात खरेदी करता येणार स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच, १ एप्रिलपासून होताहेत हे मोठे बदल

नवी दिल्ली : चांगला स्मार्टफोन असावा असे प्रत्येकालाच वाटते. पण, अनेकदा स्मार्टफोन खरेदीत किमतीही अडचण येते. पण, आता प्रत्येक जण स्मार्टफोन खरेदी करू शकतील. सर्व सामन्यांसाठी आनंदाची बातमी असून बजेट युजर्स आता कमी किमतीत चांगले स्मार्टफोन्स खरेदी करू शकणार आहे. १ फेब्रुवारी रोजी २०२२ चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कस्टम ड्युटीबाबत अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर गॅझेटच्या अनेक वस्तू महाग होणार असल्या तरी अनेक गोष्टी स्वस्तही होणार आहेत. आज आम्ही तुम्हाला १ एप्रिल २०२२ नंतर कोणत्या गॅजेट्सशी संबंधित वस्तू स्वस्त होत आहेत आणि कोणत्या वस्तूमुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील याबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. या यादीवर एक नजर टाकूया. वाचा: स्मार्टफोन स्वस्त होऊ शकतात: सरकारने मोबाईल फोन चार्जरचे ट्रान्सफॉर्मर पार्ट्स, मोबाईल कॅमेरा मॉड्यूल्सच्या कॅमेरा लेन्स आणि इतर अॅक्सेसरीजवरील कस्टम ड्युटी ५ वरून १२.५ % पर्यंत कमी केली आहे. त्यामुळे स्मार्टफोन बनवण्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि ब्रँड्स हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे. म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून तुम्ही स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड स्वस्त मिळण्याची शक्यता आहे: तुम्हाला जर स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड्सची विशेष आवड असेल तर तुम्ही ते देखील कमी खर्चात खरेदी करू शकणार आहात. मार्च २०२३ पर्यंत स्मार्टवॉचच्या काही भागांना सीमाशुल्कातून सूट दिली जाईल. यामुळे उत्पादकांची किंमत कमी होईल आणि स्मार्टवॉचच्या किमतीत घट होऊ शकते. त्यामुळे स्मार्टवॉच घेण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला थोडी वाट पहा. वायरलेस इअरबड्स महागण्याची शक्यता आहे: तुम्हाला जर वायरलेस इयरबड्सची विशेष आवड असेल तर तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. इयरबड्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या भागांवर आयात शुल्क वाढविण्यात आले आहे, ज्यामुळे उत्पादनाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. वापरकर्त्यांना वायरलेस इयरबड, नेकबँड हेडफोन आणि इतर तत्सम गॅझेटसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. प्रीमियम हेडफोन महाग होऊ शकतात. हेडफोन्सच्या थेट आयातीवर आता २० % अधिक शुल्क आकारले जाईल, याचा अर्थ युजर्सना हेडफोन खरेदी करण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. १ एप्रिलपासून नवीन घोषणा प्रभावी होतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kdrGW2I

Comments

clue frame