नवी दिल्ली: आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज ला यावर्षी लाँच करणार आहे. यूजर्स अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत आहेत. लाँचआधी फोनचे फीचर्स समोर येत आहेत. कंपनीकडून फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये iPhone 14 च्या फीचर्सबाबत माहिती समोर आलेली आहे. iPhone 14 सीरिज सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, या बहुप्रतिक्षित सीरिजमध्ये एक फीचर न मिळाल्याने यूजर्स नाराज होण्याची शक्यता आहे. हे फीचर कोणते आहे त्याविषयी जाणून घेऊया. वाचा: iPhone 14 मध्ये मिळणार नाही १२० हर्ट्ज प्रमोशन डिस्प्ले एका रिपोर्टनुसार, iPhone 14 मध्ये हाय रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज प्रमोशन डिस्प्ले मिळणार नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ग्लोबल चिप शॉर्टेजमुळे Apple स्क्रीन सप्लाय BOE ला iPhones साठी ओलेड पॅनेलच्या प्रोडक्शन संबंधित समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच, बीओई Apple च्या ओलेड पॅनेल सप्लाय चेनमध्ये आपली हिस्सेदारी वाढवण्याची शक्यता आहे. कारण आगामी आयफोन १४ सीरिजसाठी ६.०६ इंच पॉलीक्रिस्टलाइन सिलिकॉन, पातळ फिल्म-ट्रांजिस्टर ओलेड पॅनेलचा पुरवठा करणार आहे. iPhone 14 प्रो मॉडेलची किंमत असेल जास्त दरम्यान, Apple ने iPhone X, iPhone 11, iPhone 12, iPhone 13 आणि मध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह LTPS डिस्प्ले दिला होता. रिपोर्टनुसार, आयफोन १४ प्रो मॉडेलमध्ये नॉचच्या जागी एक आय-शेप कटआउट असेल. तसेच, या सीरिजची किंमत देखील जास्त असण्याची शक्यता आहे. लाँचिंगनंतरच या अपकमिंग स्मार्टफोन सीरिजच्या किंमतीचा खुलासा होऊ शकेल. iPhone 14 बाबत आतापर्यंत समोर आलेली माहिती
- आयफोन १४ सीरिज अंतर्गत आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्सला यावर्षी लाँच केले जाईल.
- एका लेटेस्ट रिपोर्टनुसार, iPhone 13 Pro चा सक्सेसर असलेल्या iPhone 14 Pro मध्ये ८ जीबीपर्यंत रॅम दिली जाऊ शकते.
- iPhone 14 Pro मॉडेलमध्ये अपग्रेडेड ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- Apple पहिल्यांदाच फुल स्क्रीन फ्रंटसह फोनला सादर करू शकते. तसेच, आयफोनच्या टॉपवरील नॉचला हटवण्याची शक्यता आहे. सेल्फी कॅमेऱ्याच्या डिझाइनमध्ये डिव्हाइसच्या समोर एक पिल शेप होल मिळण्याची शक्यता आहे.
- तसेच, आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार iPhone 14 मध्ये १२८ ते २५६ जीबीच्या पुढील स्टोरेज मिळेल. या चारही मॉडेलमध्ये ५जी नेटवर्क आणि पॉवरफुल चिप दिली जाईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Z0BbKsL
Comments
Post a Comment