Apple ने चाहत्यांची वाढवली धाकधूक, iPhone 14 च्या फीचर्सने केले सर्वांना आश्चर्यचकीत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: दिग्गज टेक कंपनी यावर्षी आपल्या सीरिजला लाँच करणार आहे. नेहमीप्रमाणेच फोनच्या लाँचिंगआधीच स्पेसिफिकेशन्सबाबत रिपोर्ट समोर येत आहेत. या वर्षाखेर १४ सीरिज बाजारात एंट्री करू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन फीचर्सबाबत माहिती देणार आहोत, जे आयफोन १४ सीरिजमध्ये मिळावे असे प्रत्येक यूजर्सला वाटत आहे. जर हे तीन फीचर्स फोनमध्ये दिल्यास, नक्कीच डिव्हाइस बाजारात धुमाकूळ घालेल. iPhone 14 मध्ये USB-C चार्जिंग पोर्ट मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फीचरची चर्चा सुरू आहे. वाचा: सध्या USB-C चार्जिंग पोर्ट अँड्राइड स्मार्टफोनमध्ये वापरले जाते. आयफोन व्यतिरिक्त सर्व फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्टचा सपोर्ट मिळतो. आयफोन १४ मध्ये USB-C चार्जिंग पोर्टचा सपोर्ट मिळाल्यास, यूजर्सला याचा नक्कीच फायदा होईल. तसेच, रिपोर्टनुसार, अ‍ॅपल लाइटनिंग आणि यूएसबी २.० डेटा ट्रान्सफरच्या जागी कंपनी काही वर्षात पोर्टलेस आयफोन जारी करेल. तसेच, २०१५ पासून आयफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा वाइड – अँगल कॅमेरा दिला जात आहे. सात वर्षानंतर आता यूजर्सला आशा आहे की Apple यावर्षी लाँच होणाऱ्या आयफोन १४ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा देऊ शकते. कंपनी पिक्सल-बिनिंग प्रोसेस, सुपर पिक्सल आणि लो-लाइट फोटोग्राफीमध्ये सुधारणा करू शकते. या प्रोसेसचे वैशिष्ट्ये म्हणजे यात फोटो आपोआप १२ एमपी आकारात राहतो. iPhone यूजर्सला गेल्या अनेक वर्षांपासून तेच तेच स्पेसिपिकेशन्स मिळत आहे. त्यामुळे आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये फास्ट ५जी सपोर्टसह अनेक शानदार फीचर्स मिळावेत, असे प्रत्येक आयफोन यूजर्सला वाटत आहे. ५जी चा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे १० गीगाबिटपेक्षा अधिक स्पीड उपलब्ध करणे आहे. सध्या केवळ क्वालकॉम एक्स६५ हे एक मात्र मॉडेम असे आहे, जे १० जीबीपीएस स्पीड देण्यास सक्षम आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सीरिजबाबत वेगवेगळे रिपोर्ट समोर येत आहे. दरवर्षीप्रमाणे कंपनी यंदा देखील सप्टेंबर महिन्यात आपल्या फ्लॅगशिप फोन्सला लाँच करू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sHkmiCU

Comments

clue frame