नवी दिल्ली: तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Apple च्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर मिळत आहे. ई-कॉमर्स साइट वर Apple 12 Mini फोन ३३,९०० रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनची फ्लिपकार्टवर फक्त २६,००० रुपयात विक्री होत आहे. तर वर हाच फोन ५९,९०० रुपयात उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Apple फोन खरेदी करण्याची यापेक्षा मोठी संधी मिळणार नाही. या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: डिस्काउंट ऑफर स्मार्टफोनचे ६४ जीबी व्हेरिएंट २९ टक्के डिस्काउंटसह Flipkart वर फक्त ४२,९९९ रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. सिटी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के किंवा ७५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा लाभ मिळत आहे. तसेच, Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय १०० रुपये कॅशबॅकचा देखील फायदा मिळेल. या फोनवर १५,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो. एक्सचेंज ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास iphone 12 Mini ला तुम्ही २६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. एवढेच नाही तर फोनला दरमहिना फक्त १,४४६ रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. आयफोन १२ मिनीवर एक वर्षाची वॉरंटी मिळते. iPhone 12 Mini चे स्पेसिफिकेशन्स iphone 12 Mini स्मार्टफोनमध्ये ५.४ इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सल आणि १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहेत. तर सेल्फीसाठी फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. आयफोन १२ मिनीमध्ये ए१४ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. फोन सिरॅमिक शील्डसह येतो. वॉटर रेसिस्टेंटसाठी या फोनला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. फोनमध्ये नाइट मोड, ४के डॉल्बी व्हिजन, एचडीआर रेकॉर्डिंग सारखे फीचर्स मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aABJlfn
Comments
Post a Comment