YouTube: आता जाहिरातींशिवाय पाहा YouTube व्हिडिओ, कंपनीने आणला वर्षभराचा Premium प्लान; पाहा किंमत

नवी दिल्ली : व्हिडिओ प्लॅटफॉर्मने ने भारतात आणि चा वर्षभराचा सबस्क्रिप्शन प्लान लाँच केला आहे. याआधी युट्यूबचे पेड सबस्क्रिप्शन एक महिना आणि तीन महिन्यांचे होते. आता यूजर्स वर्षभरासाठी एकदाच सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. वाचा: YouTube Premium आणि YouTube Music Premium चा प्लान भारत आणि अमेरिकेसह इतर देशातील यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या या प्लान्सवर डिस्काउंट देखील देत आहे. यूजर्स वर्षभराच्या प्लानला अँड्राइड डिव्हाइस अथवा वेबच्या माध्यमातून सबस्क्राइब करू शकतात. रिपोर्टनुसार, हा प्लान इंडव्ह्यूजअल यूजर्ससाठी आहे. म्हणजेच, विद्यार्थी आपल्या अकाउंटवरून प्लान घेऊ शकत नाही. YouTube प्लानवर एक प्रमोशन ऑफर देत आहे. यूजर्स २३ जानेवारीपर्यंत याचा लाभ घेऊ शकतात. ऑफर अंतर्गत YouTube Premium ला १,१५९ रुपये आणि YouTube Music Premium ला ८८९ रुपयात घेऊ शकता. ऑफर समाप्त झाल्यानंतर सबस्क्रिप्शनसाठी किती पैसे खर्च करावे लागतील याची माहिती मात्र कंपनीने अद्याप दिलेली नाही. YouTube Premium च्या महिन्याच्या प्लान्ससाठी १२९ रुपये आणि YouTube Music Premium साठी ९९ रुपये खर्च करावे लागतात. YouTube च्या सपोर्ट पेजनुसार, वर्षभराचा प्लान सध्या भारत, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, जपान, रशिया, थायलंड, तुर्की आणि अमेरिकेत उपलब्ध झाला आहे. जे यूजर्स सध्या जुने प्लान्स वापरत आहेत, ते रद्द करून वर्षभराचा प्लान देखील घेऊ शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fGyqoN

Comments

clue frame