WhatsApp: WhatsApp ग्रुप Admin असाल तर 'या' ५ गोष्टी टाळाच,अन्यथा होऊ शकते तुमचे मोठे नुकसान

नवी दिल्ली: आजकाल सगळेच आपल्या मित्र- मैत्रीण आणि कुटुंबियांसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने कनेक्टेड राहतात. यासाठी वर अनेक ग्रुप देखील तयार केले जातात. यामध्ये एक अॅडमिन असतो. ज्याच्याकडे अनेक अधिकार असतात. तो एखाद्याला ग्रुपमध्ये अॅड करू शकतो आणि एखाद्याला काढूनही टाकू शकतो. पण, अॅडमिनवर अनेक जबाबदाऱ्या देखील असतात. वाचा: ग्रुपमध्ये कोणतेही बेकायदेशीर काम झाल्यास त्याची जबाबदारी फक्त ग्रुप अॅडमिनची असते. अशा परिस्थितीत ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर केला जात आहे. याविषयी ग्रुप अॅडमिनला माहिती असणे आणि समज असणे आवश्यक आहे. अन्यथा, ग्रुप अॅडमिनला तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्हीही जर एखाद्या ग्रुपचे अॅडमिन असाल तर तुम्ही या ५ गोष्टी लक्षात ठेवा. कधीही देशविरोधी कन्टेन्ट शेअर करू नका: ग्रुपमध्ये कोणीही देशविरोधी मजकूर शेअर करू नये. ही अॅडमिनची जबाबदारी आहे. यामुळे ग्रुप अॅडमिनला तुरुंगवासही होऊ शकतो. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये याप्रकरणी एका व्यक्तीला (ग्रुप अॅडमिन) अटक करण्यात आली आहे. अश्लील कन्टेन्ट शेअर करू नका: ग्रुपमध्ये अश्लील मजकूर शेअर करणेही गुन्ह्याच्या कक्षेत येते. उदाहरणार्थ चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित मेसेज शेअर करणे हा गुन्हा आहे. वैयक्तिक व्हिडिओ किंवा फोटो शेअर करू नका: व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणाचेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ परवानगीशिवाय शेअर करू नका. असे केल्यास तो गुन्ह्याच्या कक्षेत येतो. यावरही कारवाई होऊ शकते. मग तो अॅडमिन असो वा इतर कोणीही. हिंसा भडकावणाऱ्या पोस्ट शेअर करू नका: जर कोणी धर्माचा अपमान करणारा व्हिडिओ पोस्ट केला तर हिंसाचार भडकावल्याबद्दल पोलीस त्याला अटक करू शकतात. फेक न्यूज देखील पोस्ट करू नका: व्हॉट्सअॅपवर कुणीही काहीही लिहून पोस्ट करतो आणि ते शेयर केले जात असल्याचे असे दिसून आले आहे. यासंदर्भात एक कायदाही बनवण्यात आला आहे, ज्याअंतर्गत जर कोणी फेक न्यूज चालवणाऱ्यांविरोधात तक्रार केली तर त्याचे अकाउंट खाते बंद केले जाते. वाचा:i वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fP5Lha

Comments

clue frame