WhatsApp Feature: WhatsApp वर लवकरच येणार नवीन फीचर, वाढणार ग्रुप Adminचे पॉवर, मिळणार 'हे ' विशेष अधिकार

नवी दिल्ली: तुम्ही वापरत असाल आणि या इन्स्टंट मेसेजिंग अॅपवरील ग्रुपचे अॅडमिन असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. खरं तर, लवकरच व्हॉट्सअॅप तुम्हाला एक पॉवरफुल फीचर देणार आहे. कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, ज्या अंतर्गत तुम्ही () ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा मेसेज तुम्हाला हवं तेव्हा डिलीट करू शकाल . या वैशिष्ट्याची चाचणी सुरू असून ते लवकरच रिलीज होऊ शकते. काय आहे हे वैशिष्ट्य आणि ते कसे काम करेल ते पाहा. वाचा: कसे असेल वैशिष्ट्य? रिपोर्टनुसार, मेटाच्या मालकीची ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून या फीचरवर काम करत आहे. यावर अनेक चाचण्या झाल्या असून फीचर लवकरच रिलीज होण्याची अपेक्षा आहे. या फीचरला मॉडरेशन फीचर म्हटले जाऊ शकते आणि ते टेलिग्रामवरील फीचरसारखेच असेल. ते आल्यानंतर, ग्रुप अॅडमिनला त्याच्या ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा मेसेज आक्षेपार्ह वाटल्यास तो हटवता येईल. या फीचरची अनेक दिवसांपासून ग्रुपकडे मागणी होत होती. आता लोक त्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. कसे करेल काम? रिपोर्टनुसार, या फीचरशी संबंधित एक स्क्रीनशॉटही व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दाखवण्यात आले आहे की, जर ग्रुप अॅडमिन एखादा मेसेज डिलीट करू शकत असेल तर ते युजर्सना कसे दिसेल. ( Group Admin can Delete Message) म्हणजेच त्याच्यासमोर तो मेसेज कशा प्रकारे येईल . स्क्रीनशॉटमधील मेसेज हटवल्यानंतर, एक मजकूर दिसला, ज्यामध्ये असे लिहिले होते की, हा मेसेज Admin ने डिलीट केला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/whatsapp-to-add-new-features-group-admin-will-be-able-to-delete-any-messages-read-details/articleshow/89174965.cms

Comments

clue frame