WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपने आणले नवीन फीचर! Android आणि iOS यूजर्सला मिळणार मोठी पॉवर; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप लवकरच आणि डिव्हाइसमध्ये चॅट हिस्ट्री मायग्रेशन फीचर देणार आहे. गेली अनेक दिवसांपासून यावर काम सुरू आहे. आयओएससाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या २२.२.७४ बीटा सोर्स कोडद्वारे याचा खुलासा झाला आहे. या व्हर्जनमधून नवीन फीचरचे संकेत मिळतात. वाचा: लवकरच आणि मध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याची परवानगी देईल. मात्र, ही थेट प्रोसेस नसेल. मायग्रेशन प्रोसेससाठी दोन्ही डिव्हाइसमध्ये अ‍ॅप इंस्टॉल असणे गरजेचे आहे. सोबतच, मायग्रेशन प्रोसेस प्रायव्हेट वाय-फाय कनेक्शनच्या माध्यमातून काम करेल. याप्रमाणे इतर मेसेजिंग अ‍ॅप, गुगल ड्राइव्ह, आयक्लाउड आणि क्लाउट सर्व्हिसचा वापर करून यूजर डेटा स्टोर आणि सिंक करतात. आतापर्यंत आयओएस आणि अँड्राइड फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप डेटाला सिंक करण्यासाठी अधिकृत पद्धत ही केवळ डिव्हाइस आहे. केवळ सॅमसंगच्या डिव्हाइसद्वारेच डेटा दोन्ही प्लॅटफॉर्म्समध्ये मायग्रेट करता येतो. आयफोनला सॅमसंगच्या डिव्हाइसला केबलद्वारे कनेक्ट करून किंवा सॅमसंगच्या स्मार्टस्विच अ‍ॅपचा वापर करून डेटा ट्रान्सफर केला जातो. अनेकदा चॅटमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्यांची भविष्यात गरज भासू शकते. अशा स्थितीमध्ये चॅट डिलीट झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अँड्राइडमधून आयओएसमध्ये स्विच करताना असे होऊ शकते. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप हे खास फीचर आणत आहे. हे नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी खूपच उपयोगी ठरेल. यामुळे यूजर्स सहज व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्रीला आयफोनमध्ये ट्रान्सफर करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HbIG4k

Comments

clue frame