Vivo Y21e : धुमाकूळ घालायला लवकरच येतोय Vivo चा मिड रेंज स्मार्टफोन, स्वस्तात मिळणार मस्त फीचर्स

नवी दिल्ली : हा कंपनीचा Y-श्रेणीतील आगामी मिड रेंज स्मार्टफोन आहे. या फोनची अधिकृत लाँच तारीख अद्याप उपलब्ध नाही. परंतु, फोनच्या रेंडर्स आणि मुख्य वैशिष्ट्यांबद्दलची माहिती समोर आली आहे. डिव्हाइस ब्रँड द्वारे Vivo Y33s ची रिप्लेसमेंट म्हणून ऑफर केले जाऊ शकते. Vivo Y21e स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेट, १३ MP प्रायमरी सेन्सर, Android 12 OS आणि १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. यात वॉटरड्रॉप नॉच, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल रियर कॅमेरा सेन्सर आहे. वाचा: Vivo Y21e : डिझाइन Vivo Y21e मध्ये सेल्फी स्नॅपरसाठी सेंटर-पोझिशन वॉटरड्रॉप नॉच आणि मोठा बॉटम बेझल असेल . व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण उजव्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरसह आहे. मागे, एक आयताकृती मॉड्यूल आहे ज्यामध्ये ड्युअल कॅमेरे आणि एक LED फ्लॅश आहे. हा फोन व्हाइट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये पाहिला जाऊ शकतो. Vivo Y21e चे स्पेसिफिकेशन्स: Vivo Y21e मध्ये स्क्रीनच्या तळाशी वॉटरड्रॉप नॉच आणि मोठ्या बेझेलसह ६.५१-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. त्याची परिमाणे १६४.2×७६×8८ mm आणि वजन १८२ ग्रॅम आहे. हा फोन Android १२ सह येण्याची शक्यता आहे आणि १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी पॅक करेल. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी f/१.८ अपर्चरसह समोर ८ MP स्नॅपर आहे. हँडसेटच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/२.२ अपर्चरसह १३ MP प्रायमरी सेन्सर आणि f/ २.४ अपर्चरसह २ MP दुय्यम लेन्स आहे. असे म्हटले जात आहे की, हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० SoC प्रोसेसर, ३ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेजसह येईल. परंतु,असा देखील अंदाज आहे की लाँचच्या वेळी इतर पर्याय असू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3K6DcKp

Comments

clue frame