Tecno Smartphones: या कंपनीने ४ जुन्या स्मार्टफोन्सना दिला ५ GB पर्यंत एक्स्ट्रा व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, पाहा लिस्ट

नवी दिल्ली: युजर्ससाठी चांगली बातमी आहे. ने आपल्या जुन्या स्मार्टफोनसाठी अतिरिक्त रॅम सपोर्ट दिला असून यासाठी Tecno ने नुकतेच मेमरी फ्यूजन फीचर जारी केले आहे. या फीचर सपोर्टद्वारे, टेक्नोने आपल्या चार स्मार्टफोन्ससाठी ५ GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट दिला आहे. ज्या स्मार्टफोन्सना अतिरिक्त रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये, Tecno Camon 18, Pova Neo, Spark 8T आणि Spark 8 Pro चा समावेश आहे. मेमरी फ्यूजन वैशिष्ट्य युजर्सना वर्च्युअल च्या अतिरिक्त GB उधार घेण्यास अनुमती देते. वाचा: व्हर्च्युअल रॅम सपोर्ट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुमचा स्मार्टफोन ४ GB रॅम आणि ६४ GB इनबिल्ट स्टोरेज पर्यायासह येतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अधिक रॅम सपोर्टची आवश्यकता असेल, तर तुम्ही इनबिल्ट स्टोरेजमधून ५ जीबी रॅम घेऊ शकता, अशा प्रकारे तुमच्या फोनमध्ये एकूण ९ जीबी रॅम सपोर्ट असेल. Tecno Camon 18 स्मार्टफोन ४ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज पर्यायामध्ये येतो. त्याची किंमत १४,९९९ रुपये आहे. ज्याला ३ GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. अशा प्रकारे, फोन एकूण ७ GB रॅम सपोर्टसह येईल. Tecno Pova Neo मध्ये ६००० mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. Tecno Pova Neo सह ५ GB व्हर्च्युअल रॅम उपलब्ध असेल. अशा प्रकारे, या फोनमध्ये ११ जीबी रॅम आहे. Tecno Spark 8T स्मार्टफोन एकूण ७ GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येईल. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर Helio G35 सह सादर करण्यात आला आहे. याशिवाय, यात ५० मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर, Tecno Spark 8 Pro ची किंमत१०,९९९ रुपये आहे. नवीन अपडेटनंतर या फोनची रॅम ३ जीबीपर्यंत वाढेल म्हणजेच आता एकूण ७ जीबी रॅम असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://bit.ly/3Hgnqus

Comments

clue frame