Social Media Apps: तुम्हीही रात्री उशिरापर्यंत हे ५ Apps वापरत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकतात या समस्या

नवी दिल्ली : भारतात सोशल मीडिया अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लाखो युजर्स सोशल मीडिया वापरतात. तुम्ही ही त्यापैकी एक असालच. स्लीप जंकीच्या सर्वेक्षण अहवालात असे समोर आले आहे की, ५ अॅप्समुळे युजर्सना वेळेत झोप न येण्यासारख्या सारख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे . हे अॅप्स ७८ % युजर्सच्या झोपेवर परिणाम करत आहेत. वाचा: यात सर्वात वर चिनी अॅप टिक-टॉक आहे. ते युजर्सना सर्वाधिक नुकसान पोहोचवत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर आणि फेसबुकचा क्रमांक लागतो. याशिवाय, Pinterest, YouTube, Reddit आणि Tumblr यांचाही समावेश आहे. रात्रभर बेडवर मोबाईल स्क्रोल केल्याने झोप न येण्यासारख्या अडचणींचा सामना युजर्स करत आहेत. या आहेत समस्या: रात्रभर सोशल मीडियाचा अति वापर केल्याने सकाळी उशिरा झोप लागते. दिवसभर थकवा आणि डोकेदुखीची समस्या जाणवते. इतकेच नाही तर रात्री सोशल मीडिया वापरल्याने कामावर देखील परिणाम होत आहे. हे अॅप्स सर्वाधिक वापरले जातात: यात पहिला क्रमांक यूट्यूबचा येतो. ८५.८ % लोक ते वापरतात. त्याच वेळी, ७५.७ % लोक फेसबुकवर, ७०.६ % लोक इंस्टाग्रामवर आणि ५०६ % लोक ट्विटरवर सक्रिय आहेत. देशात ६३ कोटींहून अधिक इंटरनेट युजर्स: देशात एकूण ६३२४ दशलक्ष इंटरनेट युजर्स आहेत. त्यापैकी ४४८ दशलक्ष युजर्स सोशल मीडियाचा वापर करतात. २०२१ मध्ये भारतात ३१ टक्के सोशल मीडिया वाढला आहे. तर, ८ टक्के इंटरनेट युजर्स देखील वाढले आहेत. फेसबुकवर सर्वाधिक सक्रिय युजर्स फेसबुक हे ६०० दशलक्ष सक्रिय युजर्स असलेले सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. रिपोर्टनुसार, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया नंतर ही समस्या वाढली आहे. रिपोर्टनुसार, युजर्स सरासरी दिवसात ५ तास २४ मिनिटे स्मार्टफोनमध्ये सक्रिय असतात. वाचा: वाचा वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GqITk0

Comments

clue frame