Smartwatch: ‘या’ कंपनीने लहान मुलांसाठी आणली शानदार स्मार्टवॉच, नक्कीच आवडतील याचे कमालचे फीचर

नवी दिल्ली: लाइफस्टाइल ब्रँड ने भारतात आपल्या प्रोडक्ट्सची रेंज वाढवत लहान मुलांसाठी स्मार्टवॉचला लाँच केले आहे. या वॉचला खासकरून लहान मुलांसाठी लाँच केले आहे. या वॉचची किंमत ३,४९९ रुपये आहे. ७ दिवसांच्या बॅटरी लाइफसह येणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये लहान मुलांसाठी अनेक कामाचे फीचर मिळतात. वाचा: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ZOOOK Dash Junior स्मार्टवॉचमध्ये १.४ इंच स्क्रीन दिली आहे. ही स्क्रीन स्क्वेअर डिझाइनमध्ये येते. कंपनीने यामध्ये लहान मुलांसाठी अनेक कामाचे फीचर दिले आहे. झूकची ही वॉच ८ इन-बिल्ट गेम आणि ६ वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोडसह येते. या वॉचमध्ये १० अलार्म देखील सेट करता येतात. हे अलार्म मुलांचे डेली रुटीनचे काम जसे की, सकाळी लवकर उठणे, ब्रेकफास्ट, शाळेत जाण्याची वेळ, होमवर्क, स्पोर्ट्स आणि झोपण्याचा टाइम इत्यादी लक्षात आणून देईल. वॉटर रेसिस्टेंटसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. डिव्हाइस ७ दिवसांच्या बॅटरी लाइफसह येते. ZOOOK Dash Junior मध्ये ८ वॉच फेसेजसह हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटरिंग सेंसर देखील दिली आहे. कंपनीची ही पहिलीच आहे. याशिवाय कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये ऑडिओ, ट्रू वायरलेस इयरबड्स, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि गेमिंग कॅटेगरीजसाठी अनेक शानदार प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33WKLTi

Comments

clue frame