Smartwatch Launch: स्मार्टवॉचची आवड असणाऱ्यांसाठी Fire-Boltt Ninja 2 Max कमी किमतीत भारतात लाँच, पाहा फीचर्स

नवी दिल्ली: Fire-Boltt ने भारतात बजेट स्मार्टवॉच लाँच केली असून या स्मार्टवॉचची किंमत १,८९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Fire-Boltt Ninja 2 Max आता Amazonवर विक्रीसाठी उपलब्ध असून तुम्हाला वॉच ब्लॅक, डार्क ग्रीन आणि रोझ गोल्ड या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल. वाचा: Fire-Boltt Ninja 2 Max : वैशिष्ट्ये Fire-Boltt Ninja 2 Max मध्ये २४० x २८० पिक्सेल रिझोल्यूशनसह १.५ -इंच टच स्क्रीन डिस्प्ले आहे. हे कॅपेसिटिव्ह आणि रिस्पॉन्सिव्ह टच इंटरफेससह टच स्क्रीन डिस्प्ले आहे. UI नेव्हिगेट करण्यासाठी बाजूला एक भौतिक बटण आहे. Fire-Boltt Ninja 2 Max वॉच २०० पेक्षा जास्त वॉच फेसला देखील सपोर्ट करते. आरोग्याशी संबंधित वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टवॉचमध्ये युजर्सना SpO2 सेन्सर, हृदय गती ट्रॅकर, हृदय गती मॉनिटरसह, कॅलरी बर्न करणे आणि एकूण अंतर प्रवासाची माहिती मिळते. याव्यतिरिक्त, Fire-Boltt Ninja 2 Max चालणे, धावणे, सायकलिंग, बास्केटबॉल, स्किपिंग, फुटबॉल, पोहणे, बॅडमिंटन यासह २० स्पोर्ट्स मोडचे समर्थन करते. बॅटरी लाइफच्या बाबतीत सांगायचे तर, Fire-Boltt Ninja 2 Max एकाच चार्जवर ७ दिवस टिकू शकते . हे घड्याळ IP68 पाणी आणि धूळ प्रतिरोधक देखील आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये WhatsApp, SMS, कॉल अलर्ट, Facebook, YouTube, ब्राइटनेस ऍडजस्टमेंट, संगीत नियंत्रण, कॅमेरा नियंत्रण, ड्रिंकिंग वॉटर रिमांडर्स, पीरियड रिमाइंडर, हवामान अपडेट्स आणि स्टॉपवॉच/अलार्म यांचा समावेश आहे. हे स्मार्ट घड्याळ वजनाने खूप हलके आहे. तसेच, त्याची डिझाईन देखील खूप प्रीमियम आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून स्मार्ट घड्याळ घेण्याचा विचार करत असाल, तर ते तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. युजर्सच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत हे घड्याळ भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qzG3Un

Comments

clue frame