Smartphone Launch: ६००० mAh मजबूत बॅटरीसह Tecno Pova Neo लाँच, किंमत १३,००० पेक्षा कमी

नवी दिल्ली: हँडसेट निर्माती कंपनी Tecno ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केला आहे. Tecno Pova Neo च्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटला स्प्लॅश रेझिस्टंटसाठी IPX2 रेटिंग मिळाले आहे. तसेच, या हँडसेटमध्ये DTS साउंडचा अनुभवही मिळेल. याशिवाय, यात एक मजबूत बॅटरी आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Tecno Pova Neo चे स्पेसिफिकेशन्स: सॉफ्टवेअर: हा फोन Android 11 वर आधारित High OS ७.६ वर काम करतो. बॅटरी: या नवीन स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची मजबूत बॅटरी आहे. जी, एका चार्जवर दीर्घकाळ काम करते. बॅटरी ५५ दिवसांचा स्टँडबाय टाइम, १९० तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि ४३ तासांचा कॉलिंग वेळ देते. रिटेल बॉक्समध्ये १८ W फ्लॅश चार्जर उपलब्ध आहे. जो, फोनची बॅटरी १ तासापेक्षा कमी वेळेत ५० टक्के चार्ज करू शकतो. फोनमध्ये दिलेला अल्ट्रा सेव्हिंग मोड फोनच्या बॅटरीला दीर्घकाळ सपोर्ट करण्यास मदत करतो. डिस्प्ले: हा Tecno स्मार्टफोन ८९ : ४२ % स्क्रीन-टू-बॉडी रेशो, २६२ पिक्सेल प्रति इंच पिक्सेल घनता आणि ४८० निट्स ब्राइटनेससह ६.८ -इंच HD+ डिस्प्ले दाखवतो. ग्राहकांना फोनमध्ये १२० Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. कनेक्टिव्हिटी: सुरक्षेसाठी फोनच्या मागील पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे. कॅमेरा: फोनच्या मागील पॅनलवर क्वाड फ्लॅशलाइटसह १३ मेगापिक्सेल AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, ६ GB LPDDR4x RAM सह MediaTek G25 प्रोसेसर मेमरी फ्यूजन तंत्रज्ञानाच्या मदतीने ५GB वाढवता येणारी रॅम ऑफर करतो. १२८ GB eMMC ५१ इंटर्नल स्टोरेज आहे . मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ GB पर्यंत वाढवणे शक्य आहे Tecno Pova Neo किंमत भारतात: या Tecno मोबाइल फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. या किंमतीत कंपनी हँडसेटसह १४९९ रुपये किमतीचे Tecno Earbuds देखील देत आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटची विक्री २२ जानेवारीपासून रिटेल स्टोअरमध्ये सुरू होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fEvitF

Comments

clue frame