Redmi Note 11 Launch: ठरलं! या दिवशी होणार Redmi Note 11 सीरीज लाँच,येथे पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग

नवी दिल्ली: Redmi Note 11 मालिकेची ग्लोबल लाँच तारीख निश्चित झाली असून Redmi Note 11 सीरिज २६ जानेवारी २०२२ रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. Xiaomi कडून ट्विट करून Redmi Note 11 सीरीजच्या लाँच डेटची घोषणा करण्यात आली आहे. लाँच भारतीय वेळेनुसार ५:३० वाजता होणार असून त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या फेसबुक आणि यूट्यूबच्या सोशल मीडिया हँडलवरून केले जाईल. वाचा: Redmi Note 11 सीरीजचे नवीन स्मार्टफोन्स चीनपेक्षा वेगळे असतील: चीनमध्ये, स्मार्टफोनची ही Series MediaTek SoCs सह सादर करण्यात आली आहे. नवीन मॉडेल Redmi Note 10 फोनचे अपग्रेडेड मॉडेल असू शकते. Redmi Note 11 5G, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro + स्मार्टफोन मागील वर्षी चीनमध्ये Redmi Note 11 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आले होते. तसेच, नोव्हेंबरमध्ये, Redmi Note 11 4G ला चीनमध्ये लाँच करण्यात आला. ज्याने Redmi Note 11 लाइनअपचा विस्तार केला. : Redmi Note 11 5G स्मार्टफोन भारतात Redmi Note 11T 5G म्हणून सादर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोन भारतात Xiaomi 11i आणि Xiaomi 11i हायपरचार्ज 5G म्हणून सादर केले गेले आहेत. हे सर्व स्मार्टफोन्स चीनमध्ये Redmi Note 11 लाइनअपसह MediaTek SoC सपोर्टसह येतात. रिपोर्टनुसार, Redmi Note 11 मॉडेल जागतिक बाजारात स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केले जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tFiEm8

Comments

clue frame