Realme: बहुप्रतिक्षित Realme 9i स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत एवढी कमी की विश्वास बसणार नाही; पाहा फीचर्स

नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित 9i भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचा: Realme 9i ची किंमत आणि उपलब्धता ची सुरुवाती किंमत १३,९९९ रुपये आहे. ही फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. या फोनला Prism Black आणि Prism Blue रंगात सादर केले आहे. फोनला २५ जानेवारीपासून , Realme.com आणि ऑफलाइन रिटेलर्सवरून खरेदी करता येईल. ऑनलाइन फोनचा अर्ली सेल २२ जानेवारीपासून सुरू होईल. Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स ड्यूल नॅनो सिम सपोर्टसह येणारा ९आय हा अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. यात ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. याचा टच सँपलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. तसेच, Dragon Trail Pro प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ६८० प्रोसेसरसह LPDDR४X रॅम मिळते. इंटर्नल मेमरीच्या मदतीने तुम्ही ५ जीबीपर्यंत व्हर्च्यूअली रॅम वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच, २ मेगापिक्सल पोट्रेट शूटर आणि २ मेगापिक्सल मॅक्रो शूटर मिळतो. फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये पॉवरसाठी ३३ वॉट डार्ट चार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nBJY10

Comments

clue frame