QR Code: महत्वाचे !आता QR कोड स्कॅनच्या मदतीने काही सेकंदात ओळखता येणार औषध खरे की बनावट, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: वाढत्या संसर्ग आणि आजारांमुळे बनावट औषधांमध्येही वाढ झाली असून यावर आळा घालता यावा याकरिता सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. सरकारने आता औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स (API) वर क्यूआर कोड टाकणे अनिवार्य केले आहे. ज्याच्या मदतीने आता काही सेकंदात औषध खरे की बनावट हे ओळखता येणार असून ग्राहकांना मोबाईलवर QR कोड स्कॅन करून औषधाची माहिती सहज मिळू शकणार आहे. या नव्या निर्णयामुळे बनावट औषधांना आळा बसू शकतो. जर तुम्हाला QR बद्दल जास्त माहित नसेल आणि ते नेमके कसे काम करते हे जाणून घ्यायचे असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. पाहा डिटेल्स. वाचा: या QR कोडमध्ये औषधाची संपूर्ण माहिती असेल. उदाहरणार्थ, सॉल्ट, बॅच नंबर किंवा किंमत. मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला औषधाची संपूर्ण माहिती मिळेल. पुढील वर्षी १ जानेवारी २०२३ पासून हा नियम लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. एपीआयमध्ये क्यूआर कोड टाकण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आता खरी आणि बनावट औषधे सहज ओळखता येणार आहेत. एवढेच नाही तर एपीआयमधील क्यूआर कोडवरून हेही कळेल की, कच्च्या मालाचा पुरवठा कुठून करण्यात आला आहे? औषध कुठे वितरीत केले जात आहे? गोळ्या, इंटरमीडिएट्स, कॅप्सूल आणि सिरप बनवण्यासाठी 'सक्रिय फार्मास्युटिकल घटक' हे मुख्य कच्चा माल आहेत. औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (DTAB) जून २०१९ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. QR कोड कॉपी करणे अशक्य आहे. कारण, तो बॅच नंबरसह बदलतो. QR बद्दल बोलायचे तर, याचा अर्थ क्विक रिस्पॉन्स असा होतो. ही बारकोडची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. जी जलद वाचनासाठी डिझाइन केलेली असते. अहवालानुसार, भारतातील जवळपास २५ टक्के औषधे बनावट आहेत. ज्यामुळे भारत जगातील बनावट औषधांसाठी तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fGUAqY

Comments

clue frame