Prepaid Plans: डेटा-कॉलिंगसह अनेक बेनिफिट्ससोबत येणारे एअरटेलचे बेस्ट प्लान, किंमत फक्त २६५ रुपये

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान्स सादर करत असतात. एअरटेलकडे देखील कमी किंमतीत जास्त फायदे देणारे काही प्लान्स आहेत. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटासह अनेक बेनिफिट्स मिळतील. २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे हे प्लान तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकतात. वाचा: २८ दिवसांच्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कंपन्या या वैधतेसह येणाऱ्या प्लानमध्ये जास्त बेनिफिट्स देत आहे. एअरटेलच्या अशाच दोन स्वस्त प्लान्सविषयी जाणून घेऊया. एअरटेलचा २६५ रुपयांचा प्रीपेड प्लान तुम्ही जर जास्त डेटा वापरत नसाल तर हा प्लान तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. एअरटेलच्या २६५ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० एसएमएस, दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. डेली डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. एअरटेलचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलचा २९९ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. डेली डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. हा प्लान देखील २६५ रुपयांच्या प्लान सारखा असून, यात दररोज ०.५ जीबी डेटा जास्त मिळतो. या दोन्ही प्लान्समध्ये ग्राहकांना थँक्स बेनिफिट्स मिळतात. प्लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल अ‍ॅडिशन, मोफत हॅलो ट्यून्स आणि विंक म्यूझिकचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. कमी किंमतीत जास्त फायदे हवे असल्यास हे दोन्ही प्लान्स चांगले पर्याय आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33BePDS

Comments

clue frame