Prepaid Plans: डेटा समाप्त होण्याचे टेन्शनच नाही! Vi च्या ‘या’ प्लानमध्ये मिळेल डेटा-कॉलिंग-ओटीटी बेनिफिट्स, किंमत २९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीकडे काही स्वस्त प्लान्स उपलब्ध असून, यात अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. या प्लानमध्ये डेटा-कॉलिंगची सुविधा मिळते. कंपनीकडे २९९ रुपये, ३९९ रुपये, ४०९ रुपये आणि ५९९ रुपयांचे प्लान्स आहेत. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: वीआयचे २९९ रुपये, ३९९ रुपये, ४०९ रुपये आणि ५९९ रुपयांचे प्लान्स
  • २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.
  • ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ४२ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.
  • ४०९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत.
  • ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७० दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.
या प्लान्समध्ये मिळेल अतिरिक्त बेनिफिट्स हे सर्व प्लान हिरो अनलिमिटेड आणि ओव्हर-द-टॉप (ओटीटी) बेनिफिट्ससह येतात. प्लानमध्ये वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा अ‍ॅक्सेस मिळतो. याशिवाय वीकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि डेटा डिलाइट्सचा फायदा मिळतो.
  • वीकेंड डेटा रोलओवर ऑफर अंतर्गत यूजरला वीक-डेज (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान वाचलेले डेटा वीकेंडला (शनिवार आणि रविवार) वापरता येईल.
  • बिंज ऑल नाइट ऑफर अंतर्गत यूजर्सला रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते.
  • डेटा डिलाइट्स ऑफर अंतर्गत कंपनीकडून दरमहिन्याला अतिरिक्त २ जीबी डेटा मोफत दिला जातो. यूजर्सला दिवसाला १ जीबी इमर्जेंसी डेटा स्वरुपात याचा वापर करू शकतात.
वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G5l3Jt

Comments

clue frame