Prepaid Plans: किंमत समान, फायदे वेगवेगळे! जिओच्या 'या' प्लानसोर Airtel-Vi फेल, मिळेल ९० GB डेटा आणि Disney+ Hotstar

नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी , आणि या टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक शानदार प्लान्स आणत आहे. तिन्ही कंपन्यांकडे असे काही प्लान्स आहेत, ज्याची किंमत समान आहे. परंतु, यात मिळणारे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबीपर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. या प्लानची किंमत समान आहे. या प्रीपेड प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: जिओचा ६०१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ६ जीबी अतिरिक्त डेटा, अशाप्रकारे एकूण ९० जीबी डेटा मिळतो. तसेच, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस आणि एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. Vodafone Idea चा ६०१ रुपयांचा प्लान वीआयच्या या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. प्लानमध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइटची सुविधा देखील दिली जात आहे. चा ५९९ रुपयांचा प्लान Airtel चा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये देखील दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या प्रीपेड प्लानमध्ये एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, ३० दिवसांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत ट्रायल देखील मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fNp4rp

Comments

clue frame