Powerbank: बाप रे! या पठ्ठ्याने बनवला तब्बल २७ मिलियन mAh चा पॉवरबँक, टीव्ही-वॉशिंग मशीन वापरणेही शक्य

नवी दिल्ली: स्मार्टफोनचा वापर वाढल्याने बाजारात पॉवरबँक्सची मागणी देखील वाढली आहे. सर्वसाधारणपणे सामान्य यूजर ५००० एमएएच आणि १०००० एमएएचचा खरेदी करतो. तर काही यूजर्सचा जास्त वापर असल्याने ते २०,००० mAh चे पॉवरबँक्स खरेदी करतात. मात्र तुम्ही कधी २७ मिलियन mAh पॉवरबँकबद्दल ऐकले आहे का? चीनच्या एका पठ्ठ्याने स्वतःच २७ मिलियन एमएएच पॉवर बँक तयार केला आहे. वाचा: ही व्यक्ती युट्यूब क्रिएटर असून, त्याने या पॉवरबँकचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये व्यक्ती सांगताना दिसत आहे की, त्यांच्या मित्रांचे जास्त क्षमतेचे पॉवरबँक पाहून वैतागलो होतो व त्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी सर्वात मोठा व जास्त वेळ टिकणारा पॉवरबँक तयार केला आहे. पॉवर बँकला पाहून असे वाटते की व्यक्तीने एक मोठा फ्लॅट बॅटरी पॅक खरेदी केला आहे. यानंतर बॅटरी पॅकला सिल्वर मॅटेलिक केसिंगद्वारे सुरक्षित केले आहे, जेणेकरून डिझाइन नियमित पॉवर बँक सारखे दिसेल. पुढील स्टेप इनपुट आणि आउटपुट चार्जिंग पोर्ट सेटअप करणे होते. व्यक्तीने या पॉवरबँकमध्ये एक इनपुट आणि ६० आउटपुट चार्जिंग पोर्ट दिले आहेत, जे २२०V सपोर्ट करते. त्यांनी सांगितले की, या पॉवर बँकद्वारे एकाच वेळी , आणि सारखे २० डिव्हाइस चार्ज करता येतील. याशिवाय पॉवर बँकच्या हाय २०२वी वोल्टेज रेटिंगमुळे याद्वारे टीव्ही, वॉशिंग मशीन आणि इलेक्ट्रिक इंडक्शन कुकर पॉट देखील वापरू शकता. मात्र, या पॉवर बँकला केवळ मनोरंजनासाठी बनवले आहे असे वाटते. कारण, याच्या आकारामुळे पोर्टेबल नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EqXezRD0H

Comments

clue frame