OnePlus: भन्नाट! OnePlus च्या 'या' स्मार्टफोनचा धुमाकूळ, फक्त १ सेकंदात १०० कोटी रुपये किंमतीच्या हँडसेट्सची विक्री

नवी दिल्ली : च्या नवीन स्मार्टफोनला ग्राहकांची जबरदस्त पसंती मिळताना दिसत आहे. या स्मार्टफोनने विक्रीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. फक्त १ सेकंदात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या स्मार्टफोनची विक्री झाली आहे. हा OnePlus 10 Pro असून, कंपनीने काही दिवसांपूर्वीच फोनला लाँच केले होते. फोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. वाचा: च्या पहिल्या सेलमध्ये फक्त १ सेकंदात १०० मिलियन युआन (जवळपास ११७ कोटी रुपये) किंमतीच्या फोन्सची विक्री झाली. OnePlus 10 Pro चे बेस व्हेरिएंट ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,६९९ युआन (जवळपास ५५ हजार रुपये) आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,९९९ युआन (जवळपास ५८,४०० रुपये) आहे. OnePlus 10 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच सेकंड जनरेशन LTPO एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल Sony IMX७८९ सेंसर आहे. यात ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि ८ मेगापिक्सल टेलिफोटो लेंस मिळते. मुख्य आणि तिसऱ्या सेंसरमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबलाइजेशन दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये नवीन स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. यात पॉवरसाठी ८० वॉट वायर्ड फ्लॅश चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वायर्ड चार्जिंगने फोन ३२ मिनिटात फुल चार्ज होईल. तर वायरलेस चार्जिंगने ४७ मिनिटात चार्ज होईल. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा देखील पर्याय मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rfzXYd

Comments

clue frame