NFT : अजबच! ‘या’ पठ्ठ्याने ५ वर्ष दररोज काढले सेल्फी, आता तेच फोटो विकून झाला कोट्याधीश

नवी दिल्ली : म्हणजेच मुळे एक २२ वर्षीय मुलगा कोट्याधीश झाला आहे. इंडोनेशियाच्या सुल्तान गुस्ताफ अल घोजालिकने स्वरुपात आपल्या सेल्फी विक्री केली आहे. एनएफटी ही एक डिजिटल प्रॉपर्टी असते, जी रियल-वर्ल्ड आयटम्सची मालकी दर्शवते. वाचा: हा एक कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असून, त्याचे वय २२ वर्ष आहे. रिपोर्टनुसार, सुल्तान पाच वर्ष दररोज आपल्या कॉम्प्युटर समोर बसून सेल्फी काढत असते. त्याच्या सेल्फीला काहीजण टी-शर्टवर प्रिंट करत आहेत, तर काहीजण गाण्यात वापर करत आहेत. गुस्ताफने या सेल्फीचा वापर ग्रेज्यूशन दरम्यान एक टाइम-लॅप्स व्हिडिओ बनवण्यासाठी केला व त्यानंतर एनएफटी म्हणून विकण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ९३३ सेल्फीला Ghozali Everyday नावाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वर लिस्ट केले होते. Ghozali ने सांगितले की, त्याला वाटले नव्हते की कोणी त्याचे सेल्फी खरेदी करेल. याच कारणामुळे त्याने केवळ ३ डॉलर्सवर लिस्ट केले होते. रिपोर्टनुसार, Ghozali च्या फोटोला एका सेलिब्रेटी शेफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले होते. त्यानंतर त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ५०० यूजर्सने Ghozali च्या फोटोला खरेदी केले. त्याचे कलेक्शन ३८४ Ether चे झाले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, आज २३० पेक्षा अधिक फोटोंची विक्री झाली व मला लक्षात येत नाहीये की तुम्ही माझे फोटो का खरेदी करत आहात. मात्र, माझ्या ५ वर्षांच्या प्रयत्नांसाठी तुम्ही जे दिले त्यासाठी मी आभारी आहे. त्याने पुढील लिहिले की, कृपया माझ्या फोटोसोबत छेडछाट करू नका अन्यथा माझ्या कुटुंबाला वाईट वाटेल. माझा तुमच्यावर विश्वास आहे. रिपोर्टनुसार, सुल्तान या पैशांना गुंतवण्याचा विचार करत आहे. तसेच, एक अ‍ॅनिमेशन स्टुडिओ देखील खरेदी करण्याचा त्याचा विचार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rDYKFE

Comments

clue frame