Micromax : गॅलेक्सी S२१ सारखा लुक आणि ४८MP कॅमेरा, आज लाँच होणार Micromax IN Note २ फोन

नवी दिल्ली: भारतीय स्मार्टफोन कंपनी आज आपला नवीन हँडसेट ला लाँच करणार आहे. फोन दुपारी १२ वाजता लाँच होईल. हा २०२० मध्ये आलेल्या IN Note 1 स्मार्टफोनचे अपग्रेडेड मॉडेल असेल. नवीन स्मार्टफोन आपल्या डिझाइनमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मायक्रोमॅक्सने सारखी डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे. फोनचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले आहेत. वाचा: फ्लिपकार्टवर होईल विक्री टीझर फोटोंमध्ये फोनला ब्राउन रंगात दाखवण्यात आले आहे. फोन ब्लॅक कलर पर्यायासह येईल. फोटोमध्ये फोनच्या रियर पॅनेलमध्ये चार सेंसर स्पष्ट दिसत आहे. सोबतच, एक एलईडी फ्लॅशसह ४८ मेगापिक्सल कॅमेरा लिहिला आहे. कॅमेरा डिझाइनमुळे सॅमसंगच्या फोनची आठवण येते. पुढील बाजूला सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल दिला आहे. या स्मार्टफोनची विक्री शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टद्वारे होईल. फ्लिपकार्ट लिस्टिंगमध्ये देखील फोनच्या काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. संभाव्य स्पेसिफिकेशन्स फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला जाईल, जो चांगल्या पिक्चर क्वालिटीसह येतो. कंपनीने रिफ्रेश रेटचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे यात ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे. कंपनीनुसार, IN Note 2 मध्ये मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर दिला जाईल. फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. IN Note 2 स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल. यात ६ जीबी/८ जीबी रॅम आणि ६४ जीबी/१२८ जीबी स्टोरेज दिले जाईल. हा फोन अँड्राइड ११ वर काम करेल. हँडसेट क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ५ मेगापिक्सल दुसरा सेंसर आणि २ मेगापिक्सलचे दोन सेंसर असतील. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35bh80Y

Comments

clue frame