Metaverse: कमालच झाली! आता आभासी जगात होणार लग्न, जाणून घ्या भारतातील पहिल्या मेटाव्हर्स लग्नाबाबत

नवी दिल्ली: करोनामुळे पाहुण्यांना बोलवून लग्न-समारंभ करणे अडचणीचे झाले आहे. सरकारकडून देखील यावर काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ठराविक लोकच लग्नाला उपस्थित राहू शकतात. मात्र, यावर उपाय म्हणून तामिळनाडूत भारतातील पहिले मेटाव्हर्स होणार असून, या लग्नाला अनेकजण उपस्थित राहू शकतात. एका यूजरने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. वाचा: मेटाव्हर्स काय आहे? मेटाव्हर्समध्ये ऑग्मेंटेड रियालिटी, व्हर्च्यूअल रियालिटी आणि व्हिडिओ टूलचा वापर केला जातो. यात आभासी जगामध्ये लोकं एकमेकांशी डिजिटली कनेक्ट होऊ शकतात. थोडक्यात, तुम्ही घरी असला तरी तुमचा अवतार मेटाव्हर्समध्ये असेल, ज्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. मेटाव्हर्सच्या जगातली तुमचा डिजिटल अवतार खऱ्या जगात जे करू शकतो ते सर्व करेल. याशिवाय देखील गिफ्ट स्वरुपात देता येईल. कोण होस्ट करणार लग्न? तामिळनाडूमधील एक कपल दिनेश एसपी आणि जनगानंदिनी रामास्वामी पुढील महिन्यात शिवलिंगपुरम येथे लग्न करणार आहेत. त्यानंतर ते रिसेप्शन व्हर्च्यूअली होस्ट करतील, जे देशातील पहिले मेटाव्हर्स लग्न असेल. यात पाहुणे व्हर्च्यूअली भाग घेतील. भारतातील पहिल्या मेटाव्हर्स लग्नाला पॉलिगॉन ब्लॉकचेन आणि TardiVerse मेटव्हर्स स्टार्टअप होस्ट करेल. दिनेस आयआयटी मद्रासमध्ये प्रोजेक्ट असोसिएट आहे. त्यांनाच ही कल्पना सुचवली व त्यांच्या होणाऱ्या पत्नीला देखील ही कल्पना आवडली. कशी आली सुचली मेटाव्हर्सची आयडिया? दिनेश यांनी क्रिप्टो आणि ब्लॉकचेन टेक्नोलॉजीमध्ये काम केले आहे. एक वर्षभरापासून एथेरियम मायनिंग करत आहे. ब्लॉकचेन मेटाव्हर्सचे मूळ आहे. दिनेश यांच्यानुसार लग्न ठरले त्यावेळेसच मेटाव्हर्समध्ये रिस्पेशन ठेवण्याची कल्पना सुचली. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AaxCSz

Comments

clue frame