Jio vs Airtel: ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारे धमाकेदार प्लान्स, ११२ जीबी डेटासह मिळेल मोफत कॉलिंग

नवी दिल्ली: जास्त वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला यूजर्सकडून पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या रिलायन्स आणि ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही शानदार प्लान्स ऑफर करत आहे. या प्लानमध्ये मोफत कॉलिंग, ११२ जीबीपर्यंत डेटासह अतिरिक्त बेनिफिट्स मिळतील. वाचा: जिओचा ४७९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ५६ दिवस दररोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. जिओचा ५३३ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी यानुसार एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये देखील जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. एअरटेलचा ४७९ रुपयांचा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या एअरटेलच्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. याशिवाय प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ३० दिवसांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत ट्रायल दिले जात आहे. एअरटेलचा ५४९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ५४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर प्लानमध्ये ३० दिवसांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत ट्रायल मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://bit.ly/3HoprVi

Comments

clue frame