Elon Musk: एलन मस्क यांच्या मागेच पडला १९ वर्षीय तरूण, पाठलाग बंद करण्यासाठी मागितली ‘एवढी’ रक्कम

नवी दिल्ली: १९ वर्षीय नावाचे एक अकाउंट सध्या चर्चेत आहे. Jack Sweeney हा अनेक अकाउंट्स (बॉट्स) मॅनेज करतो, ज्यातील एक आहे. हे ट्विटर बॉट चे CEO यांच्या खासगी जेटच्या उड्डानाला फॉलो करते. Sweeney कडे असे अनेक ट्विटर बॉट्स आहेत, जे एअर ट्रॅफिकच्या पब्लिक डेटाचा वापर करून सेलिब्रेटिजला ट्रॅक करतात. वाचा: Jack Sweeney इतर ट्विटर अकाउंटच्या मदतीने Bill Gates आणि Jeff Bezos सारख्या इतर सेलिब्रेटीजच्या प्रायव्हेट जेटला देखील ट्रॅक करतो. मात्र, ElonJet ट्विटर अकाउंटचे १,८०,००० फॉलोअर्स आहे. मस्क यांचे नाव असल्याने हे अकाउंट लोकप्रिय आहे. गेल्या आठवड्यात Elon Musk यांनी सुरक्षेचे कारण देत जॅकला ट्विटर बॉट डिलीट करण्यास सांगितले होते. तसेच, Elon Musk यांनी Jack Sweeney ला ५ हजार डॉलर्स देखील ऑफर केले होते. मात्र, Sweeney ने ५० हजार डॉलर्स (जवळपास ३७ लाख ५० हजार रुपये) मागितले आहेत. Jack Sweeney ने Elon Musk यांच्याशी बोलताना म्हटले होते की, ५० हजार डॉलर्स देऊ शकता का? जेणेकरून कॉलेज पूर्ण करता येईल व मॉडेल ३ देखील खरेदी करता येईल. यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली नाही. Jack Sweeney ने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मस्क यांच्या ऑफरनंतर पब्लिक प्लॅटफॉर्मवर येण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगितले की, यावर खूप मेहनत घेतली असून ५ हजार डॉलर पर्याप्त नाहीत. रिपोर्ट्सनुसार, Elon Musk यांना आता या ऑफरमध्ये कोणताही रस नाही. Jack Sweeney ने सांगितले की, ElonJet च्या निमित्ताने कोडिंगची माहिती मिळाली. याद्वारे UberJets नावाच्या एका कंपनीत पार्ट टाइम काम देखील मिळाले. सोबतच, मस्क यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WHAxR7bze

Comments

clue frame