Budget Smartphone: ४८MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसह ‘हा’ शानदार फोन लाँच, किंमत ८ हजार रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली : कंपनी ने आपल्या mBlu सीरिज अंतर्गत नवीन हँडसेट्सला लाँच केले आहे. या डिव्हाइसला कंपनीने mBlu 10 नाव दिले आहे. कमी किंमतीत हा फोन सध्या फक्त चीनमध्ये लाँच झाला आहे. मध्ये ६.६ इंच डिस्प्ले, ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Meizu mBlu 10 ची किंमत Meizu mbl 10 ला अनेक स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. फोनच्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६९९ युआन (जवळपास ८,१२४ रुपये, ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७९९ युआन (जवळपास ९,२६८ रुपये) आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९९ युआन (जवळपास १०,४४९ रुपये) आहे. फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. Meizu mBlu 10 चे स्पेसिफिकेशन्स Meizu mBlu 10 मध्ये ६.६२ इंच वॉटरड्रॉप नॉच एलसीडी स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअपसह टेम्पर्ड ग्लास पॅनेल मिळते. यात ४८ मेगापिक्सलचा सॅमसंगचा S२KGM२ प्रायमरी सेंसर, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि २ मेगापिक्सल लेंस आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा हायनिक्स एचआय८४६ कॅमेरा दिला आहे. Meizu mBlu 10 ची बॅटरी यात १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोन यूनिसॉक टी३१० प्रोसेसर सपोर्टसह येतो. यात नेक्टिव्हिटीसाठी ३.५ एमएम हेडफोन जॅक, ब्लूटूथ ४.२, इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल, २५६ जीबीपर्यंत एक्सपँडेबल स्टोरेज मिळते. फोन अँड्राइड ११ आधारित फ्लाइमे ९ ओएसवर काम करतो. याचे वजन २०१ ग्रॅम आणि जाडी ९.३ एमएम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3K5zmkt

Comments

clue frame