BSNL Plans: BSNL चा नवीन धमाका, देणार ६.५९ रुपयांच्या रोजच्या खर्चात ३ GB डेटा आणि ४५५ दिवसांची वैधता, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी ने आपल्या युजर्ससाठी BSNL २९९९ प्लान आणि BSNL २९९ असे दोन नवीन प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स सर्व मंडळांसाठी लाँच करण्यात आले आहेत. जिथे कंपनी आपली सेवा प्रदान करते. सेवा १ फेब्रुवारी २०२२ पासून रिचार्जसाठी उपलब्ध केली जाईल. आज आम्ही तुम्‍हाला BSNL च्‍या दोन्ही प्लानमध्ये उपलब्‍ध असलेले फायदे आणि वैधता याबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. वाचा: BSNL PV2999: या BSNL प्लानमध्ये कंपनी ३६५ दिवसांची वैधता देत आहे. तसेच, युजर्सना ९० दिवसांची (प्रमोशनल ऑफर अंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत) अतिरिक्त वैधता मिळेल. याशिवाय, यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस प्रतिदिन मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड ८० Kbps पर्यंत कमी होईल. या प्रमोशनल ऑफरसह BSNL २९९९ रुपयांचा प्लान एकूण ४५५ दिवसांची वैधता देईल. हे प्लॅन अशा युजर्ससाठी खूप खास सिद्ध होईल जे हेवी डेटासह दीर्घ वैधता शोधत आहेत. या प्लानची किंमत इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लानपेक्षा खूपच कमी आहे जी दररोज ३ GB डेटा देतात. BSNL PV299: या BSNL रिचार्ज प्लान सह, कंपनी २९९९ रुपयांचे सर्व फायदे देत आहे .परंतु, फरक एवढाच आहे की हा प्लान फक्त ३० दिवसांची वैधता देतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bae6Tw7fj

Comments

clue frame