Best Workout App: व्यायाम आणि आहारात मदत करतील ‘हे’ टॉप-५ अ‍ॅप्स, फिटनेस कोचप्रमाणे होईल मदत

नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीनंतर लोक आरोग्याच्याबाबतीत अधिक जागृक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासकरून आणि चांगल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यात टेक्नोलॉजीची देखील मदत घेतली जाते. अनेक अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत, जे योग्य व्यायाम आणि आहारात मदत करतात. अशाच टॉप-५ अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया. वाचा: गुगलचे हे अ‍ॅप एक शानदार वर्कआउट ट्रॅकर आहे. हे यूजर्सच्या स्पीड, उंची, रूट, वॉकिंग आणि रनिंगसह अनेक माहिती देते. अ‍ॅपद्वारे कॅलरी बर्न, किती किलोमीटर चालला, किती तास झोपला या सर्व गोष्टींची माहिती मिळते. प्ले स्टोरवरून अ‍ॅपला १० कोटीपेक्षा अधिक वेळा डाउनलोड केले आहे. नियमित योगा करणाऱ्यांसाठी हे एक चांगले अ‍ॅप आहे. यात ५०० पेक्षा जास्त आसान, १०० पेक्षा जास्त योगा, टिप्स आणि एक्सरसाइजचा टायमर आहे. यूजर्स योगाचे ड्यूरेशन, लेव्हल, गोल आणि स्टाइलला कस्टमाइज करू शकतात. तसेच, ४० पेक्षा जास्त योगा कोचची सुविधा मिळते. हे फिटनेस ट्रॅकर अ‍ॅप असण्यासोबतच, जिम ट्रेनर देखील आहे. याद्वारे मोफत फिटनेस प्लान देखील उपलब्ध होतो. यात १३०० पेक्षा जास्त एक्सरसाइज दिल्या आहेत. याद्वारे वर्कआउटला कस्टमाइज करू शकता. तुम्हाला वर्कआउटचे रिमाइंडर देखील मिळेल. इतर अ‍ॅप्सप्रमाणेच हे देखील हेल्थ आणि फिटनेसमध्ये मदत करते. हे वर्कआउट ट्रॅकर असण्यासोबतच वेट लॉस ट्रॅकर, वॉटर ट्रॅकर, फूड ट्रॅकर, स्लीप ट्रॅकर आणि हँडवॉश ट्रॅकर देखील आहे. यात होम वर्कआउटचे व्हिडिओ देखील उपलब्ध असून, यात फुल-बॉडी वर्कआउट आणि योगाचा समावेश आहे. Calorie Counter MyFitnessPal हे अ‍ॅप उत्तम आहारासाठी मदत करते. हे अ‍ॅप तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. तसेच काय खायला हवे व काय नाही, हे देखील सांगेल. यात ६० लाखांपेक्षा अधिक फूड प्रोडक्ट्सचा डेटाबेस आहे. याशिवाय फूड इनसाइट, रेस्टोरेंट लॉगिंग, रेसिपो इंपोर्टर, कॅलरी काउंटर सारखे फीचर्स देखील आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FNg8wL

Comments

clue frame