Apple Watch Feature: Apple Watch मध्ये आहे 'हे' खास फीचर, फीचर तुमच्या कामाचे, पाहा कसे वापरायचे

नवी दिल्ली: जगभरातील सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉच असून Apple वॉच सर्व मूलभूत कार्यांसह सुसज्ज आहे. जे स्मार्टफोन करू शकतो, जसे की कॉल करणे, मेसेज पाठवणे, संगीत प्ले करणे, इंटरनेट ब्राउझ करणे आणि बरेच काही. पण, तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही तुमच्या Apple Watch वर स्क्रीनशॉट देखील कॅप्चर करू शकता. वाचा: iPhone वर स्क्रीनशॉट घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त दोन बटणे एकाच वेळी दाबायची आहेत किंवा तुम्ही फक्त मागील पॅनलवर टॅप करून स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या Apple वॉचमधून स्क्रीनशॉट देखील सहजपणे कॅप्चर करू शकता, परंतु, या वैशिष्ट्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम हे वैशिष्ट्य इनेबल करावे लागेल. तुमच्या Apple वॉचवर स्क्रीनशॉट कसा कॅप्चर करायचा हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास पाहा डिटेल्स. सर्वप्रथम तुमच्या Apple iPhone वर Watch app उघडा. आता तुमच्या स्क्रीनच्या खालच्या डाव्या कोपर्‍यात माय वॉच टॅबवर टॅप करा. आता तुम्हाला General वर टॅप करावे लागेल .स्क्रीनशॉट इनेबल करण्यासाठी, खाली स्क्रोल करा आणि टॉगल चालू करा. एकदा तुम्ही हे वैशिष्ट्य इनेबल केल्यानंतर, तुम्ही एकाच वेळी डिजिटल क्राउन आणि साइड बटणावर क्लिक करून तुमच्या Apple Watch वर स्क्रीनशॉट घेऊ शकता. Apple Watch वरून घेतलेला स्क्रीनशॉट कुठे दिसेल ? आता हा स्क्रीनशॉट तुम्हाला कुठे दिसेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुमच्या Apple Watch वर कॅप्चर केलेला स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या iPhone च्या Photos अॅपमधील स्क्रीनशॉट फोल्डरमध्ये पाहू शकाल. तुम्ही इतर कोणत्याही इमेजप्रमाणे फोटो अॅपवरून स्क्रीनशॉट एडिट करू शकता, शेअर करू शकता किंवा डिलीट करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FN6j1L

Comments

clue frame