Airtel vs Vi: २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट प्लान्स, जाणून घ्या कोण देत आहे सर्वाधिक बेनिफिट्स?

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या वेैधता आणि किंमतीतील प्लान्स सादर करत आहे. या प्लान्समध्ये डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. खासगी टेलिकॉम कंपन्या आणि वोडाफोन आयडियाकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे असेच काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: दररोज १ जीबी डेटासह येणारा प्लान एअरटेलच्या २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत २६५ रुपये आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तर दुसरीकडे वीआयच्या २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत २६९ रुपये असून, यात दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. दररोज १.५ जीबी डेटासह येणारे प्लान एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तर वीआयच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. दररोज २ जीबी डेटासह येणारे प्लान आणि Vodafone Idea कडे ३५९ रुपयांचा प्लान असून, यात २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. मात्र, दोन्ही कंपन्यांचे अतिरिक्त बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. दररोज २.५ जीबी डेटासह येणारे प्लान एअरटेलच्या ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तर वीआयच्या २८ दिवसांच्या प्लानमध्ये ४०९ रुपयात दररोज २.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. दरम्यान, एअरटेलच्या या सर्व प्लानमध्ये Amazon प्राइम व्हिडिओ मोबाइल व्हर्जन आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तर वीआयच्या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोल ओव्हर आणि दर महिन्याला २ जीबी अतिरिक्त बॅकअप डेटा दिला जातो. या डेटासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FHRv4D

Comments

clue frame