नवी दिल्ली: Xiaomi २८ डिसेंबरला सादर करण्यासाठी सज्ज आहे. या स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. या स्मार्टफोनची लॉंचिंग डेट जवळ आली असून आता फोनशी संबंधित माहिती समोर येत आहे. Xiaomi ने कन्फर्म केले आहे की, व्हॅनिला १२ मॉडेलमध्ये ६.२८ -इंचाचा डिस्प्ले तर, त्याच्या लहान मॉडेलमध्ये ६.२८ -इंचाचा डिस्प्ले असेल. पाहा डिटेल्स. वाचा: आणि Xiaomi 12 Pro मॉडेल नवीन क्वालकॉम चिपसेट, स्नॅपड्रॅगन 8 Gen १ वापरतील आणि "उद्योगात सर्वात वेगवान" कामगिरी प्रदान करतील. माहितीनुसार, Xiaomi 12 Pro Android 12 वर काम करेल जो १२ GB रॅमने सुसज्ज असेल. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 स्कोअर रोल-इन करणे बाकी आहे. कारण अधिकाधिक निर्माते २०२२ फ्लॅगशिप मॉडेल तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये एक नवा कॅमेरा मिळणार असून त्याच्या मदतीने युजर्स वेगाने फोटो क्लिक करू शकतील. याचा फायदा म्हणजे, युजर्स त्यांच्या स्मार्टफोनच्या कॅमेर्यात हलत्या वस्तू अतिशय स्थिरपणे टिपू शकतील. हे नवीन तंत्रज्ञान तुम्हाला फोटोग्राफीचा एक उत्तम अनुभव देईल जे आतापर्यंत उपलब्ध असलेल्या कॅमेऱ्यांमुळे शक्य नव्हते. पण, आता असे होणार नाही आणि आता तुमचे फोटो पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि स्पष्ट होणार आहेत. एकूणच, Xiaomi 12 series शक्तिशाली वैशिष्ट्यांचा एक जबरदस्त कॉम्बो असेल जो युजर्सना खूप आवडेल. तुम्हीही या Xiaomi series स्मार्टफोन्सची वाट पाहत असाल तर आता ही प्रतीक्षा संपणार आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pk4CnB
Comments
Post a Comment