Xiaomiचे स्वस्त Earbuds लाँच, ३२ तासांपर्यंत घ्या म्यूझिकची मजा, टच कंट्रोल आणि ANC फीचरही

नवी दिल्लीः Xiaomi 12 सीरीजच्या फ्लॅगशीप स्मार्टफोनच्या लाँचिंग सोबत कंपनीने आणखी प्रोडक्ट्स सुद्धा आणले आहेत. या नवीन लाँचिंग मध्ये कंपनीने ला लाँच केले आहे. कंपनीचे हे लेटेस्ट TWS इयरफ़ोन आहे. नवीन बड्स ३ बेस मॉडल रुपाने आले आहे. नवीन बड्स ३ बेस मॉडलच्या रुपात येते. यावर्षाच्या सुरुवातीत याच्या प्रो व्हेरियंटला लाँच करण्यात आले होते. प्रो मॉडल प्रमाणे वेनिला व्हेरियंट सुद्धा हाय फाय ऑडियो सपोर्ट सोबत ४० डेसिबल पर्यंत अॅक्टिव नॉइज कॅन्सलेशन देते. चीनच्या या खास लेटेस्ट TWS ईयरबड्स मध्ये टच कंट्रोल दिले आहे. एकाच वेळी दोन डिव्हाइसला जोडता येऊ शकते. Xiaomi Buds 3 आपल्या चार्जिंग केस सोबत जोडल्यास ३२ तासांपर्यंत चालवता येते. तर एकदा फुल चार्ज केल्यानंतर ईयरबड्समध्ये ७ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळते. प्रत्येक बडचे वजन फक्त ४.६ ग्रॅम आहे. हे एक ड्युल डायमामिक ड्रायवर आहे. ज्यात HiFi ऑडियो मिळते. नॉइज कॅन्सलेशनसाठी नवीन लाँच करण्यात आलेल्या वायरलेस ईयरफोनमध्ये तीन एएनसी मोड दिले आहे. Xiaomi Buds 3 ची किंमत Xiaomi Buds 3 ला चीनमध्ये ४९९ युआन म्हणजेच जवळपास ५ हजार ८२६ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु, याला ७० यूएस डॉलर म्हणजेच जवळपास ५ हजार २२९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत विकले जाणार आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पासून खरेदी साठी उपलब्ध होणार आहे. नवीन टीडब्ल्यूएस सोबत कंपनीने बड्स ३ प्रोसाठी नवीन निळा कलर व्हेरियंट सुद्धा जारी केले आहे. जे ६४९ युआन म्हणजेच ७ हजार ४७० रुपये किंमतीत खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FEcVQX

Comments

clue frame