Xiaomi 12 Series: Xiaomi 12 चा लाँच आधीच धुमाकूळ, एकाच दिवसात २ लाखांहून अधिक फोन झाले रिझर्व्ह, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित प्री रिजर्वेशनसाठी JD.com, Tmall आणि चीनमधील इतर काही पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असता Xiaomi नुसार, पहिल्या प्री-रिझर्वेशनमध्येच तब्बल १८ हजारांहून अधिक स्मार्टफोन Tmall वर प्री रिझर्व्ह करण्यात आले. JD.com वर ही संख्या ८० हजार होती. तर, Xiaomi 12 Pro ला Tmall वर २१ हजार आणि JD.com वर ९२ हजार रिजर्वेशन झाले. वाचा: Xiaomi 12 सीरीज- स्पेसिफिकेशन्स Xiaomi 12 सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सना अनेक वेबसाइट्सकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रमाणपत्रांमध्ये, या Xiaomi 12 आणि 12 Pro च्या खास वैशिष्ट्यांबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. Xiaomi 12 मध्ये, कंपनी १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.२८ -इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देणार आहे. त्याच वेळी, Xiaomi 12 Pro मध्ये १२० Hz च्या व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह 2K LTPO डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, कंपनी Xiaomi 12 मध्ये OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० -मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ऑफर करणार आहे. यात १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि टर्शरी लेन्स आहे. Xiaomi 12 Pro च्या कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Xiaomi 12 सीरिज स्मार्टफोन LPDDR5 RAM आणि UFS ३.१ इंटर्नल स्टोरेजसह येतील. प्रोसेसर म्हणून, कंपनी या मालिकेत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट देणार आहे. OS बद्दल बोलायचे झाल्यास , MIUI १३ या Xiaomi 12 आणि 12 Pro मध्ये आउट-ऑफ-द-बॉक्स दिला जाऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32lf1GV
Comments
Post a Comment