रिचार्ज करण्याआधी हे वाचा, Vodafone Idea चे हे दोन प्लान झाले बंद, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः या महिन्याच्या सुरुवातीला Airtel आणि Jio ने Disney+ Hotstar बेनिफिट्स सोबत येणारे प्रीपेड प्लान्स (prepaid plans) बंद केले होते. तसेच एअरटेल आणि जिओने डिज्नी प्लस हॉटस्टार बेनिफिटचे दुसरे प्रीपेड प्लान्सही बंद केले होते. आता वोडाफोन आयडिया ने ही काही प्लान्सला बंद केले आहे. Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिट्स सोबत येणारे ५०१ रुपये, ६०१ रुपये, ७०१ रुपये आणि ९०१ रुपयांचे चार प्रीपेड प्लान्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. Disney+ Hotstar मोबाइलचे सब्सक्रिप्शनची किंमत ४९९ रुपये प्रति वर्ष इतकी आहे. आता वोडाफोन आयडियाने डिज्नी प्लस हॉटस्टार बेनिफिट् सोबत येणारे ६०१ रुपये आणि ७०१ रुपयाचे प्रीपेड प्लान बंद केले आहेत. ६०१ रुपयाच्या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा सोबत ५६ दिवसाची वैधता दिली जात होती. यात एका वर्षाचे डिज्नी प्लस हॉटस्टारचे अॅक्सेस मिळत होते. ७०१ रुपयाच्या प्रीपेड प्लान मध्ये डेली ३ जीबी डेटा, डिज्नी प्लस हॉटस्टारचे अॅक्सेस आणि अनलिमिटेड कॉल बेनिफिट सोबत येत होते. या प्लानलाही बंद करण्यात आले आहे. आता ५०१ रुपये आणि ९०१ रुपयाच्या प्लानसोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचे अॅक्सेस दिले जात आहेत. वोडाफोन आयडियाचे ५०१ रुपयाचा प्रीपेड प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येते. तर वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयाचा प्लान ७० दिवसाच्या वैधते सोबत येतो. एअरटेल १५५ रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्व प्लान्स सोबत प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन ऑफर करतो. जिओच्या स्ट्रिमिंग बेनिफिटचे प्लान्स ६०१ रुपयांपासून सुरू होते. या प्रीपेड प्लान्समध्ये डेली ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल दिले जातो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qpG23Q

Comments

clue frame