Vodafone Idea Plans: Vi ने पुन्हा लाँच केला दमदार बेनिफिट्ससह येणारा हा प्रीपेड प्लान, दररोज ३ जीबी डेटासह मिळतील अनेक फायदे
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने गेल्या आठवड्यात ६०१ रुपये आणि ७०१ रुपयांच्या ्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले होते. आता कंपनीने पुन्हा एकदा ६०१ रुपयांच्या प्लानला लाँच केले आहे. या प्लानमध्ये यूजर्सला डिज्नी+ हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनसह दररोज ३ जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळेल. वाचा: चा ६०१ रुपयांचा प्रीपेड प्लान वीआयच्या या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच मोफत कॉलिंगची देखील सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये यूजर्सला डिज्नी+ हॉटस्टार, विकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट, वीआय मूव्ही आणि लाईव्ह टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. कंपनीने काही दिवसांपूर्वीच बंद केले हे प्लान्स वोडाफोन आयडियाने काही दिवसांपूर्वीच ६०१ रुपये, ७०१ रुपये आणि ५०१ रुपयांच्या प्लान्सला बंद केले होते. या प्लान्समध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि मोफत कॉलिंगची सुविधा दिली जात असे. तसेच, प्रीमियम अॅपचे देखील सबस्क्रिप्शन मिळत होते. याआधी लाँच केले चार प्रीपेड प्लान्स वीआयने या महिन्याच्या सुरुवातीला ४ प्रीपेड प्लान्स लाँच केले होते. या प्रीपेड प्लान्सची किंमत १५५ रुपयांपासून ते ६९९ रुपयांपर्यंत आहे. या चारही प्लान्समध्ये हाय स्पीड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि वीआय मूव्ही अँड लाइव्ह टीव्हीचा अॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mL2eV0
Comments
Post a Comment