VIP Numbers: सहज मिळणार VIP-प्रीमियम मोबाइल नंबर, ‘ही’ कंपनी घरपोच मोफत करणार सिम कार्डची डिलिव्हरी

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सर्व्हिस अंतर्गत कंपनी प्रीमियम मोबाइल नंबर्सची मोफत होम डिलिव्हरी उपलब्ध करणार आहे. हे मोबाइल नंबर्स एखादा पॅटर्न, महत्त्वाची संख्या, जन्मतारीख इत्यादी असू शकतात. वाचा: ग्राहक प्रीमियम मोबाइल नंबर्सच्या लिस्टमधून देखील आपल्या आवडीचा नंबर निवडू शकतात. ही सर्व्हिस दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकता, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत आणि जयपूर या शहरात उपलब्ध करण्यात आली आहे. ही सर्व्हिस पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. Vi यूजर्स कंपनीच्या वेबसाइटवरून नंबर तपासू शकतात. यासाठी यूजर्सला पिन कोड, मोबाइल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर लिस्टमधून आपला आवडीचा नंबर निवडू शकतील. यूजर्स आपल्या आवडीचा नंबर देखील घेऊ शकतात. कंपनीचा दावा आहे की, शून्य डिलिव्हरी चार्जसह ग्राहकांना नवीन सिम कार्ड दिले जाईल. Vi ने काही दिवसांपूर्वीच हंगामा म्यूझिकसह भागीदारी करत ग्राहकांसाठी एक सर्व्हिस सुरू केली आहे. यूजर्सला आता ६ महिन्यांचे हंगामा प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. हंगामा म्यूझिकच्या पूर्ण लायब्ररीचा अ‍ॅड-फ्री अ‍ॅक्सेस मिळतो. याद्वारे २० भाषांमधील म्यूझिक उपलब्ध होईल. Vi अ‍ॅपचा वापर करून हंगामा म्यूझिकद्वारे प्लेलिस्ट, पॉडकास्ट आणि म्यूझिक व्हिडिओ डाउनलोड करू शकता. ही सर्व्हिस पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच, कॉलर ट्यून म्हणूनही आवडते गाणे सेट करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mrNNFj

Comments

clue frame