Upcoming Smartwatch: ठरलं ! भारतात या दिवशी लाँच होणार Dizo Watch R आणि Dizo Buds Z Pro, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: स्मार्टवॉच प्रेमींसाठी एक गुड न्यूज असून Realme चा Tech Life ब्रँड Dizo लवकरच नवीन स्मार्टवॉच बाजारात दाखल करणार आहे. हे घड्याळ ५ जानेवारीला लाँच होणार असल्याचे कंपनीने कन्फर्म केले आहे. स्मार्टवॉचसोबत, कंपनी डिझो बड्स झेड प्रो आणि डिझो बड्स ट्रू वायरलेस इयरबड्स देखील लाँच करणार आहे. वाचा: Dizo Watch R: १.३ इंच AMOLED डिस्प्लेसह येईल. डिझोच्या आगामी स्मार्टवॉचमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठा AMOLED डिस्प्ले असेल असा कंपनीचा दावा आहे. या घड्याळात मेटल फ्रेम डिझाइन आणि २.५ D वक्र ग्लास डिस्प्ले असेल. हे स्मार्टवॉच ९.९ mm स्लिम आहे. वॉच १५० हून अधिक वॉच फेसला देखील सपोर्ट करणार असून डिव्हाइस हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सरने सुसज्ज असेल. तसेच, यामध्ये ११० हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, याला वॉटरप्रूफ बॉडीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. DIZO अॅपसह जोडले जाऊ शकते. तसेच, डिव्हाइस जबरदस्त बॅटरी बॅकअप देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. Dizo Buds Z Pro: नॅचरल लाइट डिझाइनसह ऑफर केले जाऊ शकते. हे Active Noise cacnellation सह येते. कंपनीचा दावा आहे की, इयरबड्स २५ db पर्यंत बाहेरचा आवाज ब्लॉक करू शकतात. इयरबड्स १० मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि बास बूस्ट+ तंत्रज्ञानासह येतील . Dizo Buds Z Pro ८८ ms च्या कमी लेटन्सीला सपोर्ट करेल. तसेच, एका चार्जवर २५ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप युजर्सना प्रदान करेल. हे इयरबड्स Realme Link अॅपवर देखील काम करतील वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z7Nwwn

Comments

clue frame