Tecno Pova 5G: दमदार फीचर्ससह Tecno Pova 5G लाँच, स्मार्टफोन १५ मिनिटांत देणार ३ तासांचा बॅटरी बॅकअप, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: लाँच करण्यात आला असून यात ५० -मेगापिक्सेल सेन्सर आणि १८ W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यासोब,त MediaTek Dimensity 900 चिपसेटही उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे डिव्हाइस सध्या नायजेरियामध्ये लाँच करण्यात आले आहे. भारतात ते कधी लाँच होणार याची माहिती सध्या देण्यात आलेली नाही. वाचा: Tecno Pova 5G किंमत: रिपोर्टनुसार, नायजेरियामध्ये Tecno Pova 5G ची किंमत NGN १२९,००० (सुमारे२३,५००० रुपये) ठेवण्यात आली आहे. फोन सिंगल ८ GB + ११८ GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येईल असे म्हटले जात असून एकाधिक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन डॅजल ब्लॅक, पोलर सिल्व्हर आणि पॉवर ब्लू रंगात येतो. फोन अद्याप कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आलेला नाही. Tecno Pova 5G ची वैशिष्ट्ये: Tecno Pova 5G Android ८.० वर आधारित HiOS 11 वर काम करते. यात १०८० x२४६० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.९५ -इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर १२० Hz आहे. त्याच वेळी, स्क्रीन टू बॉडी रेशो ८२.८ टक्के आहे. हा फोन MediaTek Dimensity 900 SoC ने सुसज्ज आहे. यात ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. Tecno Pova 5G मध्ये क्वाड-एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा प्रणाली आहे. त्याचा प्रायमरी सेन्सर ५० मेगापिक्सेलचा आहे. दुसरा १३ -मेगापिक्सेलचा दुय्यम सेन्सर आहे. तिसरा २ -मेगापिक्सेल शूटर सेन्सर आहे. फोनमध्ये ड्युअल-एलईडी फ्लॅशसह १६ -मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी DTS स्पीकर, ब्लूटूथ v5.2, GPS/A-GPS, Wi-Fi 802.11 b/g/n, USB Type-C पोर्ट, FM रेडिओ आणि ३.५ mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे जी १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की, या फोनची बॅटरी १५ मिनिटांच्या चार्जवर ३ तासांचा बॅकअप देते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qx2Izc

Comments

clue frame