नवी दिल्ली : स्पॅम कॉलच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ट्रू कॉलरने यावर्षातील काही डेटा शेअर केला असून, या डेटामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाचा: नुसार, एका स्पॅमरने भारतात एकट्याने २०२ मिलियन केले आहे. याचा अर्थ एका फोन नंबरद्वारे दररोज ६ लाख ६४ हजार लोकांना कॉल करण्यात आला. दर तासाला २७ हजार लोकांना स्पॅम कॉल करत त्रास देण्यात आला. ट्रू कॉलरने यावर्षातील जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यानचा डेटा शेअर केला आहे. ट्रू कॉलरने म्हटले आहे की, कंपनी वेगवेगळ्या ठिकाणांवरील टॉप स्पॅमर्सच्या लिस्टवर लक्ष ठेवून असते. तसेच, त्या भागातील स्पॅमर्सला ब्लॉक केले जाते. ट्रू कॉलरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, यावर्षी भारतात स्पॅम कॉलचे प्रमाण वाढले आहे. ट्रू कॉलरच्या टॉप-२० मोस्ट स्पॅम्ड कंट्रीजच्या यादीत भारत नवव्या स्थानावर चौथ्या स्थानावर आला आहे. सर्वाधिक स्पॅम कॉलच्याबाबतीत ब्राझील टॉपवर असून, येथे हर यूजर्सला महिन्याला ३३ स्पॅम कॉल्स येतात. दुसऱ्या नंबरवर पेरू असून, येथे यूजर्सला महिन्याला सरासरी १८ स्पॅम कॉल्स येतात. भारतात यूजर्सला दर महिन्याला १६ पेक्षा अधिक स्पॅम कॉल येतात. एकूण स्पॅम कॉल्सबद्दल सांगायचे तर केवळ ट्रू कॉलर्स यूजर्सला जवळपास ३.८ अब्ज स्पॅम कॉल्स आले आहेत. कंपनीनुसार, सेल्स आणि टेलिमार्केटिंगकडून हे कॉल्स सर्वाधिक आले आहेत. तसेच, फायनेंशियल सर्व्हिसचा देखील समावेश आहे. ट्रू कॉलरने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्पॅम कॉल्समध्ये केवायसी आणि ओटीपीशी संबंधित स्कॅम केले जातात. यूजर्सकडून खासगी माहिती मागितली जाते. भारतात अशाप्रकारचे कॉल करून ओटीपी मागितले जातात. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p93K5f
Comments
Post a Comment