Smartphone: Sim Card Tray बद्दल 'ही' महत्वाची बाब अनेकांना नसते माहित, दुर्लक्ष केल्यास होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली: प्रत्येक स्मार्टफोन युजर्स अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे त्याचे हजारो रुपयांचे नुकसान होते. या चुकांमध्ये स्मार्टफोन Clean करण्यापासून ते त्याच्या देखभालीपर्यंत अनेक चुकांचा समावेश असतो. तुमच्यापैकी बहुतेकांना याची माहिती असेलच, पण स्मार्टफोनचे काही भाग असे असतात, जे काळजीपूर्वक हाताळले नाहीत तर ते खराब होऊ शकतात. आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍मार्टफोनच्‍या अशाच एका पार्टविषयी सांगणार आहोत. जो अतिशय महत्वाचा तर आहेच. शिवाय, निष्काळजीपणे हाताळला गेला तर, तुम्‍ही तुमच्‍या स्‍मार्टफोनवरून कॉल-मेसेज करू शकणार नाही. जाणून घेऊया कोणता आहे हा पार्ट आणि त्याबाबत काय खबरदारी घ्यावी. वाचा: स्मार्टफोन सिम ट्रे: स्मार्टफोनचा सिम ट्रे हा एक भाग आहे ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, तो एक नाजूक भाग आहे आणि एका छोट्याशा चुकीमुळे त्याचे मोठे नुकसान होऊ शकते. जर सिम ट्रे खराब झाला असेल तर तुम्ही त्यात सिम कार्ड प्लेस करू शकणार नाही आणि ते वापरूही शकणार नाही. खबरदारी घेणे आवश्यक: जर तुम्ही स्मार्टफोनचा सिम ट्रे घाईघाईने काढला तर तो तुटण्याची शक्यता असते, म्हणूनच तो काळजीपूर्वक काढावा. सिम इजेक्टर खास तुमच्या स्मार्टफोनच्या सिम ट्रेसाठी डिझाइन केलेले आहे, जर तुम्ही त्याऐवजी सेफ्टी पिन किंवा इतर कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरत असाल, तर हे करणे थांबवा. असे केल्याने स्मार्टफोनच्या सिम ट्रेला गंभीर नुकसान होऊ शकते आणि ते जॅम होऊ शकते. कारण, ते एका मेकॅनिजम वर काम करते. म्हणून सिम ट्रे काढण्यासाठी फक्त इजेक्टर पिनचाच वापर करावा. सिम ट्रे न काढता त्यात सिम प्लेस करू नये. कारण सिम ट्रे अतिशय पातळ प्लास्टिकचा बनलेला असून त्यावर जास्त दबाव टाकल्यास तो तुटू शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e9bvlb

Comments

clue frame