Smartphone Offers: २,५९९ रुपयात खरेदी करता येईल Redmi Note 10s स्मार्टफोन, ६४MP कॅमेऱ्यासह मिळतात अनेक दमदार फीचर्स
नवी दिल्ली : Xiaomi चा सब-ब्रँड रेडमीच्या स्मार्टफोनला Amazon अंतर्गत स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तुमचे बजेट जर २० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास हा फोन एक चांगला पर्याय ठरतो. या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Redmi Note 10s चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल-एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. कॅमेरा: फोटोग्राफीसाठी बॅक पॅनेलवर ६४ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि एक पोर्ट्रेट कॅमेरा सेंसर दिला आहे. तर सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G९५ ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. बॅटरी: ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. Redmi Note 10s ची किंमत Note 10s च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये आहे. परंतु, जुना फोन एक्सचेंज केल्यास १४,९०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. ही ऑफर जुन्या फोनच्या कंडिशन व मॉडेलवर अवलंबून आहे. जर पूर्ण १४,९०० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास Redmi Note 10s स्मार्टफोनला फक्त २,५९९ रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय बँक कार्ड्स डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयची देखील सुविधा ग्राहकांना मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zaqEMV
Comments
Post a Comment