नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात भारतात स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वनप्लस नॉर्ड २ आणि पोको एम ३ सारख्या स्मार्टफोनमध्ये आग लागल्याचे समोर आले होते. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. स्मार्टफोनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. वाचाः रिपोर्टनुसार, XT मध्ये अचानक आग लागून स्फोट झाला. याच मॉडेलसोबत जून २०२० मध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. ट्विटर यूजर संदीप कुंडूने या स्फोट झालेल्या Realme XT स्मार्टफोनचे फोटो शेअर केले आहेत. हा फोन त्यांच्या मित्राचा आहे. ट्विटर यूजरनुसार, त्यांच्या मित्राच्या स्मार्टफोनचा वापर करत असताना अचानक स्फोट झाला. त्यांनी सोशल मीडियावर याचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. यात साइड पॅनेल पूर्णपणे जळलेले दिसत आहे. डिस्प्ले देखील खराब झाला आहे. पाहताना हा स्फोट बॅटरीमुळे झाल्याचे दिसत आहे. या घटनेत व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नाही. यूजरने फोनमधून धूर निघत असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेबाबत रियलमीने मदतीचे आश्वासन दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही सांगू इच्छितो की त्या व्यक्तीशी आधीच संपर्क साधण्यात आला आहे व त्यांना जवळील अधिकृत सेवा केंद्रावर जाण्यास सांगितले आहे. आम्ही ही समस्या दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न करू. ही घटना कशामुळे घडली याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34ajYmz
Comments
Post a Comment