Smart Tv Offers: मस्तच ! १६,४०० रुपये किमतीचा 'हा' मॉडर्न सॅमसंग स्मार्ट टीव्ही घरी आणा ५ हजारांपेक्षा कमीमध्ये, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: जर तुम्ही चांगल्या डिस्प्लेसह सुसज्ज स्मार्ट टीव्हीच्या शोधात असाल, तर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर तुम्हाला अनेक अप्रतिम ऑफर्स मिळतील. आज आम्ही तुम्हाला सॅमसंगच्या ३२ -इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध असलेल्या डील बद्दल सविस्तर माहिती देणार आहो. यात तुम्ही १६,४०० रुपये किमतीचा टीव्ही फक्त ५ रुपयांमध्ये खरेदी करु शकता. पाहा डिटेल्स. वाचा: HD Ready LED TV (UA32T4010ARXXL): Samsung 32 inch HD Ready LED TV UA32T4010ARXXL ३२ इंच डिस्प्ले स्मार्ट टीव्हीची बाजारात किंमत १६,४०० रुपये आहे . परंतु, Flipkart वर तुम्ही ११० रुपयांच्या सवलतीनंतर १६,२९० रुपयांना खरेदी करू शकता. पेमेंट करताना तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला ५ % म्हणजेच ८१५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे स्मार्ट टीव्हीची किंमत १५,४७५ रुपये इतकी होईल. हा स्मार्ट टीव्ही ४ हजार रुपयांमध्ये कसा विकत घेता येईल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर, या डीलमध्ये तुम्हाला एक एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीच्या बदल्यात हा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला ११,००० रुपयांपर्यंत बचत करता येईल . जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला. तर, या सॅमसंग स्मार्ट टीव्हीची किंमत १५,४७५ रुपयांवरून ४,४७५ रुपयांपर्यंत खाली येईल. सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये: 32 Inch HD रेडी एलईडी टीव्ही (UA32T4010ARXXL) मध्ये ३२ इंचाचा डिस्प्ले, १३६६ x ७६८ पिक्सेलचे HD रेडी रिझोल्यूशन आणि ६० Hz चा रिफ्रेश दर वैशिष्ट्यीकृत आहे. हा स्मार्ट टीव्ही दोन स्पीकर आणि २० W ध्वनी आउटपुटसह येतो. तुम्हाला हवे असल्यास, या टीव्हीमध्ये दिलेल्या यूएसबी पोर्टचा वापर करून तुम्ही तुमचे आवडते व्हिडिओ, फोटो आणि चित्रपट पाहू शकता. तसेच, सॅमसंगच्या या स्लिम टीव्हीमध्ये दोन एचडीएमआय पोर्ट देखील देण्यात आले आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची बाह्य उपकरणे कनेक्ट करून कन्टेन्टचा आनंद घेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30UzL7E

Comments

clue frame