Samsung Smartphone: २,५०० रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा ५जी स्मार्टफोन, ३ हजार रुपये डिस्काउंटचाही मिळेल फायदा

नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन ५जी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे शानदार संधी आहे. सॅमसंगने सप्टेंबर महिन्यात लाँच झालेल्या आपल्या च्या किंमतीत २,५०० रुपये कपात केली आहे. किंमतीत कपात झाल्यानंतर आता फोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,४९९ रुपये आहे. तसेच, फोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी २९,४९९ रुपये मोजावे लागतील. हा फोन ब्लेजिंग ब्लू आणि आइसी ब्लू रंगात उपलब्ध आहे. वाचा: फोनला अ‍ॅमेझॉन इंडियावरून ICICI बँकेचे कार्डवापरून खरेदी केल्यास ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. चे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी+ Super AMOLED Plus डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. यात क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे दिलेत. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, एक १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि ५ मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह येणाऱ्या या फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ व्हर्जन ५, जीपीएस/A-GPS, एनएफसी आणि यूएसबी टाइप-C पोर्ट मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EwhYkR

Comments

clue frame