Samsung Smartphone: धुमाकूळ घालायला येतोय Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन, लाँचआधी किंमत-फीचर्स लीक

नवी दिल्ली : लवकरच आपला नवीन Samsung Galaxy S21 FE या फॅन एडिशनला (CES) २०२२ मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. याआधीच्या रिपोर्टमध्ये फोनच्या प्रमुख फीचर्स, डिझाइन आणि किंमतीबाबत माहिती समोर आली होती. वाचा: सॅमसंगचा फॅन एडिशन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८८८ अथवा Exynos २१०० SoCs सह ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येईल. नवीन फॅन एडिशनचे डिझाइन वॅनिला सॅमसंग गॅलेक्सी एस२१ सारखे असण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S21 FE ची संभाव्य किंमत एका रिपोर्टनुसार, च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR ७४९ (जवळपास ६४,५०० रुपये) असेल. तर ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR ८१९ (जवळपास ७०,५०० रुपये) असेल. फोनला ग्रेफाइट, लॅव्हेंडर, ओलिव्ह आणि व्हाइट रंगात सादर केले जाईल. Samsung Galaxy S21 FE चे संभाव्य फीचर्स लाँचआधी फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ड्यूल सॅम (नॅनो+ eSIM) सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित One UI ३.१ वर काम करेल. आधीच्या रिपोर्टनुसार फोनला One UI ४ सह लाँच केले जाऊ शकते. यात स्नॅपड्रॅगन ८८८ SoC अथवा Exynos २१०० SoC चा सपोर्ट मिळेल. तसेच, ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज दिले जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एस२१ एफई मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात एफ/१.९ अपर्चर लेंससह १२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, एफ/२.४ अपर्चर लेंससह ८ मेगापिक्सल टेलिफोटो सेंसर आणि एफ/२.२ अपर्चर लेंससह १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर मिळेल. यात फ्रंटला एफ/२.२ अपर्चर लेंससह ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ वी५, NFC आणि USB टाइप- C पोर्ट मिळेल. तसेच, एक्सेलेरोमीटर, अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक सेंसर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेंसर, हॉल सेंसर, लाइट सेंसर, व्हर्चुअल प्रॉक्सिमिटी सेंसर मिळू शकतात. यात फास्ट चार्जिंग आणि वायरलेस पॉवरशेअर सपोर्टसह ४,५०० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qaoTv5

Comments

clue frame