Reliance Jio: जिओच्या या स्वस्त रिचार्जवर मिळतोय १५० रुपये कॅशबॅक, जुन्या किंमतीत खरेदी करता येईल प्लान्स
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती २१ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. मात्र, तुम्ही आताही जुन्या किंमतीपेक्षा अधिक कमी किंमतीत प्रीपेड प्लान्स घेऊ शकता. Reliance आपल्या तीन प्रीपेड प्लान्ससह ऑफर देत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन प्लान्स स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: Maha Cashback ऑफर अंतर्गत प्लानमध्ये २० टक्के कॅशबॅक दिले जात आहे. कॅशबॅकची ऑफर कंपनीच्या ७१९ रुपये, ६६६ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान्सवर मिळत आहे. यासाठी JioMart Maha Cashback सेक्शनमधील एका प्लानला निवडावे लागेल. त्यानंतर JioMart Cashback चेक बॅलेन्सवर टिक करावी लागेल. येथे JioMart Cashback बॅलेन्सची माहिती दिली जाईल व ट्रांजॅक्शनवर किती रिडीम करू शकता याची माहिती मिळेल. तुम्ही मॅक्स रिडीम अमाउंटला यात भरू शकता. Reliance Jio च्या ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये १४३.८० रुपये सूट मिळेल. यामुळे प्लानची किंमत ५७५ रुपये होईल. अशाप्रकारे हा प्लान आधीपेक्षा स्वस्त होईल. या प्लानची आधी किंमत ५९९ रुपये होती.या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानची वैधता ८४ दिवस आहे. याच प्रकारचा फायदा ६६६ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान्सवर देखील मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qblHzr
Comments
Post a Comment